कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत

 बालकामगार प्रथा विरोधी दिवस 12 जुन निमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत

बीड, दि. 9 (जि. मा. का.) :- बाल कामगार ही एक अनिष्ठ प्रथा असुन ती नष्ट करण्यासाठी शासनाचे सतत प्रयत्न चालू आहेत. मात्र ही प्रथा कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. ज्या वयात मुलांनी शिकायचे, खेळायचे, हसायचे त्या वयात मुलांना कामावर जावे लागणे हे अयोग्य आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक मुलांना कामावर पाठवतात व मालक त्यांना अल्पशा मजुरीवर कामावर ठेवतात. ही बाब निश्चीतच भूषनावह नाही. 12 जुन हा बालकामगार प्रथा विरोधी दिवसाचे औचित्य साधून मी जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, चहाच्या टप-या, विविध प्रकारचे दुकाने, गॅरेज, विटभाटी, खडीकेंद्रे, जिनींग प्रेसींग, कत्तल खाने व इतर सर्व धोकादायक उद्योगातील मालकांना विनंती करते की, आपण आपल्या अस्थापनेत बालकामगार कामावर ठेऊ नयेत तसेच पालकांनाही विनंती करते की, थोड्याशा मजुरीच्या लोभापोटी आपल्या बाळाचे आयुष्य होरपळून टाकु नका.


बालकामगार उच्चाटनासाठी शासनाने अत्यंत कडक कादेशीर पाऊले उचललेली आहेत.बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियम असुधारीत अधिनियम 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रीयेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पुर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना/बालकांना धोकादायक उद्योग व प्रक्रीयांमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे.


जर मालकाने/ नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास, त्यास 6 महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये 20,000/- (अक्षरी- विस हजार रु.) ते 50,000/- (अक्षरी- पंन्नास हजार रु.) पर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाल व किशोरवयीन मुलांना कामावर ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बीड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार