राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर

 राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर 




केज :- राष्ट्रीय महामार्गा वरील पूल आणि धोकादायक वळणावर लावलेले संरक्षक कठडे हे गायब होण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी ते अर्धवट निघून पडलेले आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची व जिवीत हानी होण्याचा ढोका आहे.

केज तालुक्यातून महामार्ग क्र ५४८ सी ५४८ डी हे दोन महामार्ग जात आहे. या महामार्गावरील अनेक पुलाला लावलेले लोखंडी बॅरिकेटिंग व पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे काही ठिकाणी निघून पडलेले आहेत. तर काही ठिकाणी अज्ञात ईसमानी अज्ञात कारणासाठी  अर्धवट अवस्थेत काढून ठेवलेले आहेत. सदर कठडे चोरी देखील होण्याची दाट शक्यता असून पुलाला आणि धोकेदायक वळणावरील कठडे नसल्यामुळे अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते.


अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सदोष कामामुळे अपघात आणि जिवीत हानित वाढ :- या राष्ट्रीय महामार्गा वरील रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत तर पूल खचून त्याला भेगा पडून लोखंडी सळया उघड्या पडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी जम्पिंग रस्ता असल्याने भरधाव वेगाने जाणारी वाहने आढळून अपघात होत आहेत. मात्र याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार