मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी

 रस्त्यावरील झालेल्या अपघातात जखमी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर त्वरित लागु करा- शिवसेनेने दिले निवेदन




मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी


परळी वैद्यनाथ 

  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने रस्तावरील अपघातात जखमींना त्वरित ७२ तास मोफत उपचार हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक विधायक नविन जीआर काढला असून यामुळे राज्यातील जनतेला अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे. या जीआरचे सर्वच क्षेत्रात स्वागत केले जात आहे.या जनउपयोगी नविन जीआरची त्वरित अमलबजावणी  करण्यासाठी परळी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना शिवसेनेच्या वतिने सोमवार दि.12 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे.

या योजनेचा 

रस्त्यावरील झालेल्या अपघातात जख्मी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर परळी उपजिल्हा क्षेत्रातील सर्वच रुग्णालयाना आदेश काढावा असे निवेदन देण्यात आले.

शिवसेनेचे खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार विविध लोकाभिमुख योजना लागू करत असून त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकानी कटीबद्ध राहून कार्य करावे, यानुसार शिवसेनेचे नेते सचिन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात सर्वच क्षेत्रात आपला मुख्यमंत्री ही चळवळ सुरू करण्यात आली आहे, याप्रसंगी शिवसेनेचे नेते सचिन स्वामी,शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय कदम, गोविंद चिवडे,पांडुरंग पणखडे,जगन्नाथ कदम गावडे,अजय दाणे,जगन्नाथ गावडे,वैजनाथ गावडे,रमेश दादा लोखंडे, गणेश सारस्वत, रामेश्वर मोरे , बाळू धुमाळ,भागवत कदम,हनुमंत सरवदे,दत्ता गावडे, यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार