इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार

 खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार




परळी प्रतिनिधी 

केज येथे खा.रजनीताई पाटिल,माजी खा.अशोक पाटिल युवाने आदित्य पाटिल जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात व विविध विषयावर एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली याच बैठकीत परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या नविन पदाधिका-या नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आसुन लागलीच त्यांना नियुक्ती पञ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

परळी विधानसभा युवक अध्यक्ष रणजित देशमुख यांनी जिल्हा अध्यक्ष व युवक जिल्हा अध्यक्ष यांच्या अनुमतीने पूर्वी अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले धर्मराज खोसे यांना युवक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली तर  शेख अलीम शेख नूर,यांची युवक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व कार्याध्यक्ष मजमुन महेश वडके,उपाध्यक्ष अजय पिंपळे. ऋषिकेश लोमटे,लखन सुरवसे,सैय्यद फारुक,मारुती दराडे,रवींद्र देशमुख, उज्जेफ सिद्दीकी  यांना नियुक्ती पत्र बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष राहुल भय्या सोनवणे यांच्या उपस्थित आदित्य भाया पाटील यांच्या व खासदार रजनीताई,अशोक पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!