MB NEWS:राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiqY1LhgCTeguLWiUb4F3Hk4zv6TsR9wUPOcLqi-x1maKrj6Gr-dPEi-PhPm7h2a-obEouCjZvxoUQEZm_sx5x5OyYCjYwxBkSkcUXrI9NWzSX-RB8Awd6dKM9rEP7wndIlcYNUTMtvdgxj5UplkT7PggjB0oJ-5tL1jPm-F4uQCdU9lrFngl6BxLJI/s320/20230129_191205.jpg)
काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी यांच्या हस्ते संत गुरूलिंग स्वामी मंदीरास टयुब संच भेट राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळीच्यावतीने वैद्यनाथ मंदीर जवळील संत गुरूलिंग स्वामी मंदीरास लागणारे टयुबसंच ज्ञानसिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री 1008 जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी, काशीपीठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, सोनपेठकर, ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज,माजलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लिभेर अप्लांयसेस इंडीया प्रायव्हेट लिमिटेड,शेंद्रा,औरंगाबाद येथील कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री.किरण बेंडाळे यांच्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर अंतर्गत मंदीरास लागणा-या टयुब संचाची उपलब्धता करून देण्यात आली. याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, पदाधिकारी सचिन सौंदळे तसेच सर्व सदस्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला तसेच तपोनुष्ठान समितीचे सचिव तथा एस.पी.सप्लायर्सचे प्रो.प्रा.संतोष पंचाक्