पोस्ट्स

MB NEWS-अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध

इमेज
  अज्ञात कारण: 30शेळ्या दगावल्या तर 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अज्ञात कारणाने आतापर्यंत 30शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी  उघडकीस आली आहे. अचानक झालेल्या या घटनेने व कारण अज्ञात असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.       घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला या शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. या व्यतिरिक्त अन्य 80 पेक्षाही अधिक शेळ्या बेशुद्ध अवस्थेत असून त्या देखील दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासर्व शेळ्या शंकर दगडू वैद्य यांच्या मालकीच्या असून या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या शेळ्या कशामुळे दगावल्या यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात दहशत पसरली आहे.

MB NEWS- डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

इमेज
 डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे  वतीने सत्कार करण्यात आला.                शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल डॉ. संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजाराम मुंडे वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ह भ प गोविंद महाराज केंद्रे व  इतर उपस्थितीत होते.

MB NEWS- *एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर*

इमेज
 एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर *परळी/प्रतिनिधी* शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. तुम्ही मनातून शिव

MB NEWS- *जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक...*

इमेज
  जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक... अनेक दिवसांची इच्छा धनंजय मुंडेंमुळे आज पूर्ण झाली, मन प्रसन्न झाले - जयंत पाटील महंत नामदेव शास्त्रींचेही घेतले आशीर्वाद पाथर्डी (दि. 09) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील तसेच माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.   गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शनही घेतले. मागील अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र भगवानगड येथे येऊन दर्शन घेण्याची इच्छा आज आमचे सहकारी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली;असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.दरम्यान उभय नेत्यांनी गडाचे द्वितीय महंत ह.भ.प. भीमसिंह बाबांच्याही समधीचे दर्शन घेतले. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी गडाच्या वतीने स्वागत करून आशीर्वाद दिले. तसेच संत भगवानबाबा यांचे वस्तू संग्रहालय, गडावरील ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था व गडावर सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.  यावेळी आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब काका आजबे, युवा आघाडीचे महेबूब शेख, सतीश शिंदे, डॉ. शिवाजी

MB NEWS- *सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र*

इमेज
 सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मैत्रीची ही अशी नाती हा उजाळा त्यावरती, सुर्य-चंद्र ही बघुनी प्रकाश टाकतो या मैत्रीचा सुवास दरवळण्यासाठी  आपण सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र 30 वर्षांनंतर पुन्हा भेट झाली.परळीत स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.         सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या 10 वीच्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन दि.9 ऑक्टोबर 2022 रोजी गंगाखेड रोड, मकरंद नरवणे यांच्या शेतात (महादेव मंदिर) येथे उत्साहात दिवसभर नव्या जुन्या विद्याल्यीन जिवनातील गोष्टींना उजाळा देत संपन्न झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्र यांनी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वी केला. या वेळी उपस्थितीत सरस्वती विद्यालयातील 1991-92 बॅचचे 10 वी विभागातील वर्गमित्र  बहुसंख्येने उपस्थित होते.

MB NEWS-त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार

इमेज
  त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार परळी वैजनाथ /प्रतिनिधी    स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा राज्याने पहिला क्रमांक पटकावला त्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री.मनोजकुमार देब यांच्यासह प्रभू वैद्यनाथाच्या परळी तालुक्यातील सुपुत्र सध्या त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिवपदी कार्यरत असलेले श्री.किरण गित्ते[IAS]यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या निवास स्थानी श्री.किरण गित्ते यांचा सौंदळे परीवार तसेच श्री.संदीपशेठ टाक,श्री.बालाजी गायकवाड,श्री.राजेश ताटिपामल व मित्र परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार

इमेज
  दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार लवकरच देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार १७ आणि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उशीर का होतोय? योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, पीएम क

MB NEWS-डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार

इमेज
  डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील भुमिपुत्र डॉ.विशाल राठोड यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड यांचे खाजगी सचिवपदी नुकतीच नियक्ती झाली आहे. त्याबद्दल परळी येथे शनिवार, दि.08 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.      राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये डॉ. विशाल राठोड यांचा प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा,पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.यावेळी सरपंच हरीश नागरगोजे, कैलास तांदळे, पत्रकार धनंजय आढाव, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, महादेव शिदे, विकास वाघमारे, राजकुमार डाके व आदी उपस्थित होते. तसेच परळी शहरातील पत्रकार विकास वाघमारे यांचाही वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

MB NEWS-सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचारी करणार आंदोलन !*

इमेज
  सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचारी करणार आंदोलन ! परळी वैजनाथ :- दिपावलीसाठी सातव्या वेतन आयोगा च्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून  नगर परिषद सेवा निवृत कर्मचारी 14 ऑक्टोबर रोजी निदर्शने  व  17ऑक्टोबर  पासून न.प. कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन  करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे यानी पत्राद्वारे दिली आहे.           सेवानिवृत कर्मचाऱ्यांची सेवा उपदान व रजारोखीकरण रक्कम मिळावी म्हणून 18.7.22 रोजी दिवसभर उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनातील दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी रक्कम दिली नाही. लेखी आश्वासनाची पूर्तता करा म्हणून 10 आगस्ट रोजी पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आश्वासन न पाळणारे मुख्याधिकारी परळी शहराला पहिल्यांदाच मिळाले आहेत.याबाबत  सेवानिवृत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.18.7. 22 रोजी दोन महीन्यात 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता देउ असे लेखी देऊनही अद्याप दिला नाही.       13 ऑक्टोबर पर्यंत सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दिला नाही

MB NEWS-तानाजी उर्फ बंडू पुजारी यांचे निधन

इमेज
  तानाजी उर्फ बंडू पुजारी यांचे निधन परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...         वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पुजारी तानाजी उर्फ बंडू माणिकराव पुजारी वय ६३ यांचे आज सायंकाळी सात वाजता दुःखद निधन झाले.      वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील पुजारी मंडळापैकी एक पुजारी असलेले सर्व परिचित तानाजी उर्फ बंडू पुजारी हे केल्या काही दिवसापासून आजारी होते यादरम्यान आज दिनांक सात रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 8 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे राहते घर नांदूरवेस गल्ली परळी वैजनाथ या ठिकाणाहून सकाळी 10.00 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे निघणार आहे. 

MB NEWS-परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे रविवारी सघोष पथसंचलन

इमेज
  परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी सघोष पथसंचलन परळी वैजनाथ :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात विजयादशमी उत्सव निमित्त सघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे ह्या संचलनाची सुरुवात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ येथून दुपारी 4 वाजता होणार असून गोलाई, स्टेशन रोड, बसस्टॅंड, श्री अण्णाभाऊ साठे चौक, कावेरी प्लाझा गार्डन मार्ग, सोनार लाईन मार्ग परत महिला कॉलेज येथे संचलनाचा शेवट होईल, यासाठी संघातर्फे सर्व चोख असे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील व परिसरातील स्वयंसेवकांनी या पथसंचलनात उपस्थित रहावे असे आवाहन. रा.स्व.संघ यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

MB NEWS-बीड जिल्ह्याचा नावलौकिक करणारी परळीची लेक ... अभिनंदन श्रद्धा.. ! - खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक

इमेज
  बीड जिल्ह्याचा नावलौकिक करणारी परळीची लेक ...  अभिनंदन श्रद्धा.. ! - खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक   परळी वैजनाथ, प्रतिनिधी ... .   36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड निश्चित झाली असून या निवडीबद्दल खा.डाॅ.प्रितम मुंडे  यांनी तिचे  अभिनंदन केले आहे.     परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक  अशी आहे खा.डाॅ.प्रितम मुंडे यांची फेसबुक पोस्ट.... अभिनंदन श्रद्धा.. अहमदाबाद येथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीची लेक कू.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने स्केट बोर्डिंग खेळात सुवर्णपदक मिळवले आहे.या ऐतिहासिक कामगिरीमुळे श्रध्दा फ्रान्

MB NEWS-भागवताचार्य बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मृती सप्ताहाची सांगता

इमेज
 *भागवताचार्य बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मृती सप्ताहाची सांगता* *अण्णांनी स्वाभिमान शिकवला, कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करा, अशी शिकवण दिली. मातीशी इमान राखेन हा शब्द त्यांना दिला होता, तो पाळतोय - धनंजय मुंडे* *धनंजय मुंडे यांचे पित्याला भावूक होत नमन;*...अण्णा तुम्ही दाखवलेल्या वाटेवरच चालतोय - धनंजय मुंडे*  अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नाथ शिक्षण संस्थेमार्फत दत्तक घेण्याची घोषणा परळी (दि. 07) - शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य वर्गाला आपलेसे वाटणारे लोकाभिमुख नेते म्हणून ओळख असलेल्या स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वात अनेक नेते घडले, आज त्यांचे सुपुत्र धनंजय हे त्यांचा लोकाभिमुख वारसा समर्थपणे चालवत आहे, असे गौरवोद्गार भागवताचार्य बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांनी आज काल्याच्या किर्तनानिमित्त नाथरा येथे बोलताना व्यक्त केले. स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नाथरा या त्यांच्या जन्मगावी मुंडे कुटुंबाच्या वतीने हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या वाणीतून श्रीमद भा

MB NEWS-सत्ता असली-नसली तरी विकासाच्या बाबतीत दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही - धनंजय मुंडे

इमेज
 * सत्ता असली-नसली तरी विकासाच्या बाबतीत दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही - धनंजय मुंडे* लाडझरीत बाहेर पडणारा धो-धो पाउस अन् धनंजय मुंडेंच्या उपस्थितीतील  बैठकीस आले जाहीर सभेचे स्वरूप  सुमारे 3 कोटींच्या विकास कामांचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ परळी (दि. 06) - परळी मतदारसंघ माझा आत्मा आहे, राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना कोविडच्या काळातही मतदारसंघाचा निधी कधी थांबला नाही, आज सत्ता परिवर्तन झाले असले, तरीही आपण आपल्या ताकतीवर विकासकामांना निधी खेचून आणू, सत्तेत असलो किंवा नसलो तरीही मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत दिलेला कोणताही शब्द फिरवणार नाही, असे अभिवचन आज धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातल्या लाडझरी येथे बोलताना दिले.  लाडझरी येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुमारे 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला. तसेच यावेळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणाच्या बैठकीस अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप आले होते. यावेळी बाहेर धो-धो पावसाच्या सरी बरसत असताना धनंजय मुंडे यांनी सभा गाजवली.  लाडझरीसह या परिसरातील जनतेने माझ्यावर प्रेम व्यक्त केले आहे. त्या

MB NEWS-अमित राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर:परळीत घेणार वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  अमित राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर:परळीत घेणार वैद्यनाथाचे दर्शन  मनसे युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परळी (प्रतिनिधी.)   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित राज  ठाकरे हे दिनांक अकरा व बारा ऑक्टोंबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी होत असलेल्या या दौऱ्या प्रसंगी जिल्ह्यातील मनसेच्या युवा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेचे जिल्हा सचिव रवी नेमाने यांनी केले आहे.     प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात रवी नेमाने यांनी म्हटले आहे की, अमित राज  ठाकरे यांचे दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता परळी शहरात आगमन होणार असून आगमनानंतर ते प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणार आहेत. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर परळी तालुका मनसे जनसंपर्क कार्यालयास ते भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते बीडला होणार आहेत.   12 ऑक्टोंबर बुधवार रोजी अमित ठाकरे बीड येथील शासकीय विश्राम गृह बीड जिल्ह्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आ

MB NEWS-परळीच्या भूमिकन्येची परिश्रमांवर 'श्रद्धा' अन् रचला एक 'सुवर्ण' इतिहास!

इमेज
  परळीच्या भूमिकन्येची परिश्रमांवर 'श्रद्धा' अन् रचला एक 'सुवर्ण' इतिहास! ऑलम्पिकसाठी स्थान निश्चित झालेल्या श्रद्धा गायकवाडचा 'सुवर्ण' पदकापर्यंतचा खडतर प्रवास परळी वैजनाथ.....          परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट

MB NEWS-परळीत असा सत्कार :आय ए एस किरण गित्ते भारावले

इमेज
  परळीतील पत्रकार बांधवांच्या सत्काराने मन भारावले -किरण गित्ते  परळी वैजनाथ :- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुराने पहिला क्रमांक पटकावला. या बद्दल दिल्ली येथे आयोजित समारंभात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री मनोज कुमार देब आणि नगर विकास सचिव श्री किरण गित्ते यांना  पुरस्कार देण्यात आला. याच्या अनुषंगाने परळीतील पत्रकार बांधवांच्या वतीने त्रिपुराचे  राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि पर्यटन विभागाचे सचिव किरण  गित्ते यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.           यावेळी ज्येष्ठ पत्रकार  प्रशांत जोशी, बालासाहेब कडभाने, धनंजय आरबुने, प्रकाश सुर्यकर,धनंजय आढाव, राजेश साबणे, जगदीश शिंदे, स्वानंद पाटील, मोहन व्हावळे, महादेव शिंदे, किरण धोंड, धिरज जंगले, ज्ञानोबा सुरवसे, संजीव राॅय,गोपाळ आंधळे, संभाजी मुंडे, सुकेशनी नाईकवाडे, आत्मलिंग शेटे, संतोष जुजगर, बालासाहेब फड, अभिमन्यू फड, श्रीराम लांडगे, महादेव गित्ते, समीर इनामदार, बालाजी ढगे, दत्ता काळे, माणिक कोकाटे, शेख मुकरम, संतोष बारट

MB NEWS-9 ऑक्टोबर रोजी परळीत विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
 9 ऑक्टोबर रोजी परळीत विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन *नटराज रंगमंदिर येथे होणार व्याख्यान:डॉ.विजय भटकर, डॅा. सागर देशपांडे, बीड जिल्हाधिकारी यांची असणार उपस्थिती* परळी (प्रतिनिधी) रविवार, दि.9 ऑक्टोबर रोजी परळीतील नटराज रंगमंदिर येथे विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून, अनेक दिग्गज मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे. स्व.दिनकरराव गित्ते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून व्याख्यान कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सुपर कॉमप्युटरचे जनक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरणकुमार गित्ते, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते, साप्ताहिक जडण - घडणचे संपादक डॉ.सागर देशपांडे यांची विशेष उपस्थिती र

MB NEWS-माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

इमेज
  माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग माजलगाव : येथील माजलगाव धरण  क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस  पडत असल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सोमवारी पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून सिंदफना पात्रात 62 हजार क्युसेक ऐवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.        माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच  पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील 2 दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली.  हे धरण सोमवारी पहाटे  पुर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला. धरणाची पाणी पातळी 431.80 मीटर ऐवढी आहे .शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 100 टक्के भरले. यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले.  धरणात सध्या 62 हजार 517 क्युसेक पाण्याची आवक  आहे.  तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंद

MB NEWS- ' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!

इमेज
 ' पहाटेच्या थंड वेळी, वाट धुक्यात हरवून गेली '...! छायाचित्र:अनुप कुसूमकर, परळी वैजनाथ  परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......         गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि. ७)  शहरात थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती.एक प्रकारे " पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली " असा कवितेतील प्रत्यक्ष अनुभव परळीकरांनी अनुभवला.           आज  सकाळच्या दाट धुक्यात परळी शहर हरवले. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. धुक्यात शहर हरवल्या सारखे दिसत होते.      पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. छायाचित

MB NEWS-मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर

इमेज
  मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर  समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मेदान्ता रूग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटरच्या माध्यमातून मुलायमसिंग यादव यांच्या प्रकृतीबाबतची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, मुलायमसिंग यांना पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी रूग्णालयात येऊ नये, असे आवाहन समाजवादी पक्षाकडून करण्यात आले आहे. मागील काही काळापासून आजारी असलेले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना ( दि. २ ) रविवारी गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादव यांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

MB NEWS-प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई

इमेज
  प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई  परळी (प्रतिनिधी) विजयादशमीच्या दिवशी प्रभुवैद्यनाथांची पालखी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने काढण्यात येते. देवी काळरात्रीच्या भेटीला प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी पालखीमध्ये बसून जातात अशी आख्यायिका आहे. पालखीचे भोई म्हणून दरवर्षी निघणाऱ्या या पालखी उत्सवाचा मान परळी शहरातील भोई समाजाला असतो. प्रभू वैद्यनाथ आणि देवी काळरात्री यांचे बहीण भावांचे नाते आहे. विजया दशमीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ बहिणीसाठी म्हणजेच काळरात्री यांना बोळवण (साडी - चोळी) घेऊन जातात. सनई - चौघडे आणि वाजंत्रीच्या निनादात शहरात पालखी काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव जोरात साजरा करण्यात आला. यंदाचा पालखीचा मान आयलोजी घटमल यांच्यासह भोई समाजातील बांधवांना मिळाला. पालखीच्या सुरुवातीला खांदा देऊन भोई समाज बांधव पालखीची सुरुवात करतात

MB NEWS-परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन

इमेज
  परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी      परळीची कन्या कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 36 व्या नॅशनल स्पोर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवले त्याबद्दल प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी तिचे अभिनंदन केले आहे.    अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने स्केटबोर्डिंग  या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली. तिने कमावलेले यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने इतिहास रचून परळीचे नाव जगभरात पोहोचवले. अशी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी  तिचे  कौतुक केले.     Click- संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*   परळीतील श्रद्धा गायकवाड ही पहिलीच ऑलम्पिक मध्ये जाणारी खेळाडू म्हणून तिने आपले नाव कोरले आहे. परळी साठी ही गोष्ट अभिमानास्पद आहे. विश

MB NEWS-ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन

इमेज
  ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी ... .   36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड निश्चित झाली असून या निवडीबद्दल धनंजय मुंडे यांनी तिचे ट्विट करून अभिनंदन केले आहे.     परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. Click- संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कु.श्रध्दा र

MB NEWS-खा.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस

इमेज
  खा.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते दांडिया स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस परळी (प्रतिनिधी) विद्यानगर दुर्गोत्सव मंडळ आयोजित दांडिया स्पर्धेचे खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. नवरात्रीच्या अनुषंगाने दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. शहरातील माता - भगिनिंकडून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यानगर दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केलेले उपक्रम कौतुकास्पद आणि उत्कृष्ठ असल्याची प्रतिक्रिया खा.डॉ.प्रितामताई मुंडे यांनी व्यक्त केली. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. विद्यानगर दुर्गोत्सव समितीकडून यंदा नवरात्रीत उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तब्बल नऊ दिवस दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याचे बक्षीस वितरण खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेतील विजेत्यांना मोटरसायकल बक्षीस ठेवण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमास वैद्यनाथ बँकेचे चेरमन विनोद सेठ सामत, संचालक नारायण दादा सातपुते, शहराध्यक्ष योगेश भैय्या मेनकुदळे, बाल