इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र*

 सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या बॅचचे स्नेहमिलन ; तब्बल 30 वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मैत्रीची ही अशी नाती हा उजाळा त्यावरती, सुर्य-चंद्र ही बघुनी प्रकाश टाकतो या मैत्रीचा सुवास दरवळण्यासाठी  आपण सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र 30 वर्षांनंतर पुन्हा भेट झाली.परळीत स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

       सरस्वती विद्यालयाच्या 1991-92 च्या 10 वीच्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन दि.9 ऑक्टोबर 2022 रोजी गंगाखेड रोड, मकरंद नरवणे यांच्या शेतात (महादेव मंदिर) येथे उत्साहात दिवसभर नव्या जुन्या विद्याल्यीन जिवनातील गोष्टींना उजाळा देत संपन्न झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्र यांनी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वी केला. या वेळी उपस्थितीत सरस्वती विद्यालयातील 1991-92 बॅचचे 10 वी विभागातील वर्गमित्र  बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!