MB NEWS-प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई

  प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई 



परळी (प्रतिनिधी)

विजयादशमीच्या दिवशी प्रभुवैद्यनाथांची पालखी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने काढण्यात येते. देवी काळरात्रीच्या भेटीला प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी पालखीमध्ये बसून जातात अशी आख्यायिका आहे. पालखीचे भोई म्हणून दरवर्षी निघणाऱ्या या पालखी उत्सवाचा मान परळी शहरातील भोई समाजाला असतो.


प्रभू वैद्यनाथ आणि देवी काळरात्री यांचे बहीण भावांचे नाते आहे. विजया दशमीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ बहिणीसाठी म्हणजेच काळरात्री यांना बोळवण (साडी - चोळी) घेऊन जातात. सनई - चौघडे आणि वाजंत्रीच्या निनादात शहरात पालखी काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव जोरात साजरा करण्यात आला. यंदाचा पालखीचा मान आयलोजी घटमल यांच्यासह भोई समाजातील बांधवांना मिळाला. पालखीच्या सुरुवातीला खांदा देऊन भोई समाज बांधव पालखीची सुरुवात करतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!