MB NEWS-मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर

 मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर




 समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मेदान्ता रूग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्वीटरच्या माध्यमातून मुलायमसिंग यादव यांच्या प्रकृतीबाबतची माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, मुलायमसिंग यांना पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी रूग्णालयात येऊ नये, असे आवाहन समाजवादी पक्षाकडून करण्यात आले आहे. मागील काही काळापासून आजारी असलेले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना ( दि. २ ) रविवारी गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादव यांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !