MB NEWS-सत्ता असली-नसली तरी विकासाच्या बाबतीत दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही - धनंजय मुंडे

 *सत्ता असली-नसली तरी विकासाच्या बाबतीत दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही - धनंजय मुंडे*


लाडझरीत बाहेर पडणारा धो-धो पाउस अन् धनंजय मुंडेंच्या उपस्थितीतील  बैठकीस आले जाहीर सभेचे स्वरूप 


सुमारे 3 कोटींच्या विकास कामांचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

परळी (दि. 06) - परळी मतदारसंघ माझा आत्मा आहे, राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना कोविडच्या काळातही मतदारसंघाचा निधी कधी थांबला नाही, आज सत्ता परिवर्तन झाले असले, तरीही आपण आपल्या ताकतीवर विकासकामांना निधी खेचून आणू, सत्तेत असलो किंवा नसलो तरीही मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत दिलेला कोणताही शब्द फिरवणार नाही, असे अभिवचन आज धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातल्या लाडझरी येथे बोलताना दिले. 


लाडझरी येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुमारे 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला. तसेच यावेळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणाच्या बैठकीस अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप आले होते. यावेळी बाहेर धो-धो पावसाच्या सरी बरसत असताना धनंजय मुंडे यांनी सभा गाजवली. 


लाडझरीसह या परिसरातील जनतेने माझ्यावर प्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या या ऋणातून मी कधीही रिता होणार नाही, लाडझरीच्या मागणीनुसार 132 केव्ही उपकेंद्र मंजूर आहे, येत्या काही दिवसातच या उपकेंद्राचे काम सुरू होईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. 


धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झालेल्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ यावेळी संपन्न झाला. यामध्ये जलजीवन मिशन मधून मंजूर 1 कोटी 20 लाखांची पाणी पुरवठा योजना, 84 लाखांची विविध विकासकामे, गोसावी समाजाच्या स्मशान भूमी साठी 20 लाख, मुस्लिम स्मशानभूमी कंपाउंड साठी 15 लाख, वाणी समाजच्या स्मशानभूमीसाठी 15 लाख, सार्वजनिक स्मशानभूमीसाठी 15 लाख, गाव अंतर्गत रस्त्यांच्या विविध कामांसाठी 50  लाख, पानंद रस्ते, बुध विहार आदी कामांचा समावेश आहे. 


याप्रसंगी मा.आ. संजय दौंड, ऍड. गोविंद फड, माऊली  गडदे, बाळासाहेब देशमुख, सूर्यभान  मुंडे, पिंटू मुंडे, शिरीष नाकाडे, अशोक गुट्टे, राजाभाऊ कांदे, इंद्रजीत होळंबे, एकनाथ कांदे, सुनील घुले, ज्ञानोबा मुंडे, वैजनाथ मोठे, व्यंकट मुंडे, राजाराम मुंडे, गंगाधर मुंडे, सुदर्शन पुरी, बापूराव नाकाडे, बाबुराव तिडके, नागराज बडे, रतनहरी मुंडे, रामदत्त महाराज पुरी यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !