इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-बीड जिल्ह्याचा नावलौकिक करणारी परळीची लेक ... अभिनंदन श्रद्धा.. ! - खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक

 बीड जिल्ह्याचा नावलौकिक करणारी परळीची लेक ...  अभिनंदन श्रद्धा.. ! - खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक  



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

.   36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड निश्चित झाली असून या निवडीबद्दल खा.डाॅ.प्रितम मुंडे  यांनी तिचे  अभिनंदन केले आहे.

    परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.

खा.डाॅ.प्रितम मुंडेंकडून 'स्केटर गर्ल' चे कौतुक 

अशी आहे खा.डाॅ.प्रितम मुंडे यांची फेसबुक पोस्ट....

अभिनंदन श्रद्धा..

अहमदाबाद येथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीची लेक कू.श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने स्केट बोर्डिंग खेळात सुवर्णपदक मिळवले आहे.या ऐतिहासिक कामगिरीमुळे श्रध्दा फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली असून तिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

आपल्या जिल्ह्याची लेक प्रथमच ऑलम्पिकमध्ये सहभागी होते आहे, बीड आणि परळीकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आणि गौरव वाढवणारी आहे.श्रद्धाचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट