इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-अमित राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर:परळीत घेणार वैद्यनाथाचे दर्शन

  अमित राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर:परळीत घेणार वैद्यनाथाचे दर्शन 

मनसे युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी (प्रतिनिधी.)   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित राज  ठाकरे हे दिनांक अकरा व बारा ऑक्टोंबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी होत असलेल्या या दौऱ्या प्रसंगी जिल्ह्यातील मनसेच्या युवा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेचे जिल्हा सचिव रवी नेमाने यांनी केले आहे.

    प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात रवी नेमाने यांनी म्हटले आहे की, अमित राज  ठाकरे यांचे दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता परळी शहरात आगमन होणार असून आगमनानंतर ते प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणार आहेत. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर परळी तालुका मनसे जनसंपर्क कार्यालयास ते भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते बीडला होणार आहेत.

  12 ऑक्टोंबर बुधवार रोजी अमित ठाकरे बीड येथील शासकीय विश्राम गृह बीड जिल्ह्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बैठकीनंतर तिरुमला ऑइल इंडस्ट्री ला भेट देऊन तिथून पुढे ते नारायण गड व भगवानगडाच्या दर्शनानंतर गेवराई मार्गे जालन्याला रवाना होणार आहेत.

    अमित ठाकरे यांच्या या सर्व दौऱ्यातील कार्यक्रमांना युवा विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते व मनसे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही रवी नेमाने यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या