इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळीत असा सत्कार :आय ए एस किरण गित्ते भारावले

 परळीतील पत्रकार बांधवांच्या सत्काराने मन भारावले -किरण गित्ते 

परळी वैजनाथ :- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुराने पहिला क्रमांक पटकावला. या बद्दल दिल्ली येथे आयोजित समारंभात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री मनोज कुमार देब आणि नगर विकास सचिव श्री किरण गित्ते यांना  पुरस्कार देण्यात आला. याच्या अनुषंगाने परळीतील पत्रकार बांधवांच्या वतीने त्रिपुराचे  राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि पर्यटन विभागाचे सचिव किरण  गित्ते यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.    


      यावेळी ज्येष्ठ पत्रकार  प्रशांत जोशी, बालासाहेब कडभाने, धनंजय आरबुने, प्रकाश सुर्यकर,धनंजय आढाव, राजेश साबणे, जगदीश शिंदे, स्वानंद पाटील, मोहन व्हावळे, महादेव शिंदे, किरण धोंड, धिरज जंगले, ज्ञानोबा सुरवसे, संजीव राॅय,गोपाळ आंधळे, संभाजी मुंडे, सुकेशनी नाईकवाडे, आत्मलिंग शेटे, संतोष जुजगर, बालासाहेब फड, अभिमन्यू फड, श्रीराम लांडगे, महादेव गित्ते, समीर इनामदार, बालाजी ढगे, दत्ता काळे, माणिक कोकाटे, शेख मुकरम, संतोष बारटक्के, विकास वाघमारे, शेख बाबा, श्रावन मुंडे, कैलास डुमने, दशरथ रोडे, अमोल सुर्यवंशी, निवृत्ती खंटीग,मुदशीर शेख आदि पत्रकार बांधवाची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!