MB NEWS-डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार

 डॉ.विशाल राठोड यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते सत्कार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील भुमिपुत्र डॉ.विशाल राठोड यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड यांचे खाजगी सचिवपदी नुकतीच नियक्ती झाली आहे. त्याबद्दल परळी येथे शनिवार, दि.08 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 


    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये डॉ. विशाल राठोड यांचा प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा,पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.यावेळी सरपंच हरीश नागरगोजे, कैलास तांदळे, पत्रकार धनंजय आढाव, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, महादेव शिदे, विकास वाघमारे, राजकुमार डाके व आदी उपस्थित होते. तसेच परळी शहरातील पत्रकार विकास वाघमारे यांचाही वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !