इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचारी करणार आंदोलन !*

 सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचारी करणार आंदोलन !



परळी वैजनाथ :- दिपावलीसाठी सातव्या वेतन आयोगा च्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून  नगर परिषद सेवा निवृत कर्मचारी 14 ऑक्टोबर रोजी निदर्शने  व  17ऑक्टोबर  पासून न.प. कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन  करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे यानी पत्राद्वारे दिली आहे. 

         सेवानिवृत कर्मचाऱ्यांची सेवा उपदान व रजारोखीकरण रक्कम मिळावी म्हणून 18.7.22 रोजी दिवसभर उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनातील दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी रक्कम दिली नाही. लेखी आश्वासनाची पूर्तता करा म्हणून 10 आगस्ट रोजी पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आश्वासन न पाळणारे मुख्याधिकारी परळी शहराला पहिल्यांदाच मिळाले आहेत.याबाबत  सेवानिवृत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.18.7. 22 रोजी दोन महीन्यात 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता देउ असे लेखी देऊनही अद्याप दिला नाही.

      13 ऑक्टोबर पर्यंत सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दिला नाही तर सेवानिवृत्त  कर्मचारी 14  रोजी नगर परिषदेत निदर्शने व  17 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे सचितव जगन्नाथ शहाणे, नारायण भोसले, रहीमभाई, सय्यद ताहेर, त्रिंबक शिंदे, अर्जुन शिंदे, उत्तम सावजी,श्रीमंत  लव्हारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!