MB NEWS-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार

 दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पीएम किसान निधीचा १२ वा हप्ता जमा होणार



नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार लवकरच देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार १७ आणि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उशीर का होतोय? योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन लवकरात लवकर तुमचे ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून त्वरित १२व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक करणार.पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दोन हजार रुपयांची (दरवर्षी ६००० रुपये) आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हप्त्याची रक्कम जमा झाली असून आता १२वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार