MB NEWS-परळीच्या भूमिकन्येची परिश्रमांवर 'श्रद्धा' अन् रचला एक 'सुवर्ण' इतिहास!

 परळीच्या भूमिकन्येची परिश्रमांवर 'श्रद्धा' अन् रचला एक 'सुवर्ण' इतिहास!


ऑलम्पिकसाठी स्थान निश्चित झालेल्या श्रद्धा गायकवाडचा 'सुवर्ण' पदकापर्यंतचा खडतर प्रवास


परळी वैजनाथ.....
         परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.

       अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे.
        श्रद्धा रविंद्र गायकवाड परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील साठे नगरमध्ये राहणारी अतिशय गरीब घरातील होतकरू मेहनती,जिद्दी, चिकाटी असलेली मुलगी. सध्या  पुण्यात वाघोली येथे ती राहते.  ऑलिंपिक खेळात स्केटिंग गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे ध्येय हृदयाशी बाळगून श्रद्धा व तिचा गायकवाड परिवार अहोरात्र मेहनत करीत आहेत.श्रद्धा ही वयाच्या सातव्या वर्षापासून स्केटिंग करीत आहे.तिचा 36 व्या नॅशनल गेम्स(Women's Skateboarding Street)स्केटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळविण्याचा प्रवास अतिशय खडतर असा आहे.
                    -Video News -

          श्रद्धाचे वडील रविंद्र गायकवाड व तिची आई सौ. जयश्री यांनी आपली मुले- मुली घडावीत म्हणून दिवस-रात्र मेहनत केली. तिच्या आईने घर कामाबरोबरच उदाहरनिर्वाहासाठी इतर घरचे कामही अंगीकारले.वडील रविंद्र गायकवाड यांनी क्रिडा साहित्य विक्रेती प्रसिद्ध कंपनी असलेल्या डेक्थलॉन (Decathlon) मध्ये वाघोली या ठिकाणी सुरक्षा रक्षक (वॉचमन) म्हणून काम सुरू केले. हे काम करीत असताना श्रद्धा वडिलांकरिता दुपारचे जेवण म्हणजेच डब्बा घेऊन येत असे. तेव्हा श्रद्धाही वडीलांचे जेवण होईपर्यंत डेक्थलॉन  मध्ये स्केटिंग शिकण्याचा प्रयत्न करत असे. तिची अभीरुची ही स्केटिंग मध्ये दिसत होती हे डेक्थलॉनच्या मॅनेजरने हेरले. स्टेट बोर्डवर श्रद्धाचे खेळणे पाहून तिला जर बेसिक ट्रेनिंग दिली तर ती खूप मोठी मजल मारू शकते हे जाणून डेक्थलॉनचे स्टोअर मॅनेजर अबू शेख व तेथे काम करत असलेले कोच स्वप्नील मगरे सर यांनी श्रद्धाला खूप काही टिप्स दिल्या. मगरे सरांनी तिला कोचिंग केली. स्टोर मॅनेजर अबू शेख यांनी श्रद्धाला परवानगी दिली की तिला स्टोर मधील जो स्टेट बोर्ड आवडेल व जो शूज आवडेल तो तिने घ्यावा.माझ्याकडून तिला ही गिफ्ट असेल असे म्हणून तिला स्केटबोर्ड व शूज ची व्यवस्था झाली. परंतु श्रद्धा ने म्हटले की मी जर हे स्टेट बोर्ड आणि शूज घरी घेऊन गेले तर माझे वडील मला रागवतील तेव्हा अबू शेख आणि मगरे सर यांनी सांगितले की हे सर्व तुझ्यासाठी तुझ्या प्रशिक्षणासाठी आमच्याकडून फ्री गिफ्ट आहे. स्केट बोर्ड आणि शूज ची किंमत साधारणपणे पाच हजाराची होती.तिच्या बाराव्या वर्षी श्रद्धाने पूर्ण जोमाने स्केटिंग सुरू केली. वयाच्या सोळाव्या वर्षी ती स्केटबोर्ड पार्क मध्ये प्रशिक्षण घेत राहिली. 2018 मध्ये डिसेंबर महिन्यात जुगाड इंटरनॅशनल स्केटबोर्डिंग कॉम्पिटिशन बेंगलोर मध्ये तिने पार्टिसिपेट केले. तिला बेंगलोरला जात असताना खूप अवघड वाटत होते. ती या अगोदर आई-वडिलांना सोडून बाहेरगावी एकटी गेली नव्हती परंतु मगरे सर यांनी तिला सोबत घेऊन बेंगलोरला गेले.


       मगरे सरांनी श्रद्धा चे नववी मध्ये असताना इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले त्यावरती ते तिचे व्हिडिओ बनवीत आणि अपलोड करीत असत तसेच तिचं मनोबल वाढवीत असत बेंगलोर मध्ये तिने कांस्य पदक मिळविले.पुढे श्रद्धाला पतंजली ऍड करिता छोटासा रोल शूट करण्याची संधी सुद्धा मिळाली. त्यानंतर  दिग्दर्शक मंजारी माकिजनी व प्रोड्युसर विनाती माकिजनी यांच्या स्केटर गर्ल (Skater Girl) पिक्चर मध्ये श्रद्धाला स्केटिंग करण्याचा रोल सुद्धा मिळाला.


          त्यानंतर तिचा प्रवास राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत झाला.अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिची निवड झाली.यामध्ये जिद्द व चिकाटीने तिने  "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या माध्यमातून तिने तिच्या ध्येयाकडे झेपघेतली आहे."स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. श्रद्धा करिता हे पहिलेच गोल्ड मेडल आहे आणि हे तिच्यासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे. तिच्याकडे ऑलिंपिक चे मेडल सुद्धा मिळवण्याची हिंमत आहे.फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये  श्रध्दाने सुवर्णपदक जिंकावे आणि आपले परळीचे नाव संपूर्ण विश्वात करावे हीच तमाम परळीकर व महाराष्ट्राच्या वतीने शुभकामना!!!!!

टिप्पण्या

  1. परलीच नाव लोकिक केलं, अभिमान आहे श्रद्धा परालिकाना तुझा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !