MB NEWS-परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन

 परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी

     परळीची कन्या कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 36 व्या नॅशनल स्पोर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवले त्याबद्दल प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


   अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने स्केटबोर्डिंग  या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली. तिने कमावलेले यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने इतिहास रचून परळीचे नाव जगभरात पोहोचवले. अशी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी  तिचे  कौतुक केले.

    Click- संबंधित बातमी:■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*

  परळीतील श्रद्धा गायकवाड ही पहिलीच ऑलम्पिक मध्ये जाणारी खेळाडू म्हणून तिने आपले नाव कोरले आहे. परळी साठी ही गोष्ट अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे तिचे वडील रवींद्र गायकवाड सेक्युरिटी गार्ड चे काम करून आपल्या मुलीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले तसेच तिचा काका आणि परळी शहरातील प्रसिद्ध अनाउन्सर बालासाहेब गायकवाड हे लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांचे गेल्या पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. श्रद्धा गायकवाड ही त्याची पुतणी  आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या पुतणीने मिळवलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Video .....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !