MB NEWS- ' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!

 ' पहाटेच्या थंड वेळी, वाट धुक्यात हरवून गेली '...!


छायाचित्र:अनुप कुसूमकर, परळी वैजनाथ 

परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......
        गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि. ७)  शहरात थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती.एक प्रकारे " पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली " असा कवितेतील प्रत्यक्ष अनुभव परळीकरांनी अनुभवला.
          आज  सकाळच्या दाट धुक्यात परळी शहर हरवले. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. धुक्यात शहर हरवल्या सारखे दिसत होते.
     पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.


छायाचित्र:अनुप कुसूमकर, परळी वैजनाथ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार