इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन

 ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन





परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

.   36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड निश्चित झाली असून या निवडीबद्दल धनंजय मुंडे यांनी तिचे ट्विट करून अभिनंदन केले आहे.

    परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.

Click- संबंधित बातमी:■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*

       अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे.

    दरम्यान हा धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अभिमानास्पद असून परळीचा नावलौकिक श्रद्धा ने वाढवला असल्याचे म्हटले आहे.

     असे आहे धनंजय मुंडे यांचे ट्विट..

"अभिमानास्पद! आमच्या परळीतील गायकवाड कुटुंबाची कन्या कु.श्रद्धाने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या