MB NEWS- *जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक...*

 जयंत पाटील, धनंजय मुंडे भगवानगडावर नतमस्तक...


अनेक दिवसांची इच्छा धनंजय मुंडेंमुळे आज पूर्ण झाली, मन प्रसन्न झाले - जयंत पाटील




महंत नामदेव शास्त्रींचेही घेतले आशीर्वाद


पाथर्डी (दि. 09) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील तसेच माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 


 गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शनही घेतले. मागील अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र भगवानगड येथे येऊन दर्शन घेण्याची इच्छा आज आमचे सहकारी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली;असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.दरम्यान उभय नेत्यांनी गडाचे द्वितीय महंत ह.भ.प. भीमसिंह बाबांच्याही समधीचे दर्शन घेतले. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी गडाच्या वतीने स्वागत करून आशीर्वाद दिले. तसेच संत भगवानबाबा यांचे वस्तू संग्रहालय, गडावरील ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था व गडावर सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती दिली. 


यावेळी आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब काका आजबे, युवा आघाडीचे महेबूब शेख, सतीश शिंदे, डॉ. शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, विश्वास नागरगोजे, नितीन आघाव, प्रा. निलेश आघाव यांसह पदाधिकारी व गड परिसरातील भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !