MB NEWS-माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

 माजलगाव धरण १०० टक्के भरले; ११ दरवाजे उघडून ६२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग




माजलगाव : येथील माजलगाव धरण  क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस  पडत असल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सोमवारी पहाटे सहा वाजता 11 दरवाजे दिड मिटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून सिंदफना पात्रात 62 हजार क्युसेक ऐवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
       माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच  पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील 2 दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली.  हे धरण सोमवारी पहाटे  पुर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला. धरणाची पाणी पातळी 431.80 मीटर ऐवढी आहे .शनिवारी व रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 100 टक्के भरले. यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले.  धरणात सध्या 62 हजार 517 क्युसेक पाण्याची आवक  आहे.  तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली.

*MAJALGAON Project**                  Date=07/10/2022 @ 06:00  hrs
1] W.L= 431.80/431.80 M
2] G.S.=454.00/454.00 Mm3        
3] L.S.= 312.00/312.00 Mm3
4] LS  Percent. = 100.00%
5)Av.Inflow =18.52 cumecs/654 cuses                              
6)Gate 0pened =Nil m
  Spillway Discharge =Nil

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !