
अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी) परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत. परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या म...