आयोजन.....

 7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद!

---------------------------------------------

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत.

काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे कीर्तन, व्याख्यान, प्रवचनातून संविधान जागृती करीत आहेत. भारतीय संविधानाला 75 वर्षे होत असताना या  दोन संविधान अभ्यासकांतील हा संवाद अंबाजोगाईकरासाठी एक पर्वणीच ठरणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतआहे.




       ‌ ‌

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार