अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ



महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे

परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत. 

  परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कलेक्शनच्या वतिने दररोज आकर्षक साडी व प्रथम विजेत्या महिलेसाठी पैठणी साडी,अर्जुन लक्ष्मण नावंदे यांच्या सिध्देश्वर ज्वेलर्सच्या वतिने सोन्याची नथ,राजलक्ष्मी 1ग्रॅम ज्वेलरी,सानिया फॅशन व स्पार्कल मेकअप स्टुडीओच्या वतिने आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत.या दांडीया स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या महिलांना पेंटेवार कलेक्शनच्या खरेदीवर वतिने पाच टक्के सूट देण्यात येणार आहे.या नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी पोलिस विभागातील महिलांच्या हस्ते व डॉक्टर,वकिल,सामाजीक कार्यकर्त्या,जेष्ठ गृहिणींच्या उपसथितीत शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्या महीलांचे नारीशक्ती दांडीया महोत्सवाच्या आयोजिका तथा अरोही स्टाईल स्टुडीओच्या संचालिका सौ.श्रध्दाताई गजानन हालगे (फुलारी) यांनी स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार