MB NEWS:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा
जन्मस्थान आपेगावचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या पाटोद्यात ! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा पाटोदा /अमोल जोशी... शुक्रवारी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पाटोद्यातून दिघोळ कडे प्रस्थान केल्यानंतर शनिवार 6 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपेगाव पाटोदा नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळा शहरात आल्यावर नगरपंचायत , पोलीस पाटील व नागरिक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत शिवाजी चौक येथे करण्यात येते यावेळी बँड पथक, ढोली बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून बाजार तळ भामेश्र्वर मंदिर मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल. या ठिकाणी सर्व वारकरी भाविक भक्ताची जेवण व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा प्रदीप सरवदे यांच्या वतीने भोजन व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत जोशी व अश्रूबा जाधव यांच्या वतीने नाश्ता व चहापाणी व्यवस्था केली आहे तसेच मुळे वस्ती व बिनवडे वस्ती येथेही चहा नाश्ता होणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे जन्मगाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथू