MB NEWS:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

 जन्मस्थान आपेगावचा  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या पाटोद्यात !


 संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

  पाटोदा /अमोल जोशी...

         शुक्रवारी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पाटोद्यातून दिघोळ कडे प्रस्थान केल्यानंतर शनिवार 6 जुलै रोजी  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपेगाव   पाटोदा नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळा शहरात आल्यावर नगरपंचायत , पोलीस पाटील व  नागरिक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत शिवाजी चौक येथे  करण्यात येते यावेळी बँड पथक, ढोली बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून बाजार तळ भामेश्र्वर मंदिर मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल. या ठिकाणी सर्व वारकरी भाविक भक्ताची जेवण व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा प्रदीप सरवदे यांच्या वतीने भोजन व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत जोशी व अश्रूबा जाधव यांच्या वतीने नाश्ता व चहापाणी व्यवस्था केली आहे तसेच मुळे वस्ती व बिनवडे वस्ती येथेही चहा नाश्ता होणार आहे.  संत श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे जन्मगाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथून हा पालखी सोहळा शेकडो वर्षांपासून सुरू असून या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे आई, वडील ,व सर्व भावंडांच्या पादुका पालखीत असतात हे विशेष आहे शिस्तप्रिय पालखी सोहळा म्हणून या दिंडीची ओळख आहे.      

● ७०० वारकऱ्यांचा सहभाग 

     या पालखी सोहळ्यात साधारण सातशे वारकरी सोबत असून सर्व वारकरी हे पालखी सोहळ्या सोबतच राहतात एकही वारकरी दिंडी सोडून इकडे तिकडे जात नाहीत कुणी काहीं अन्नदान ,किंवा साहित्य दिले तरी हात लावत नाहीत  अतिशय  शिस्तबद्ध पालखी सोहळा   म्हणून यांची  ओळख आहे.   

● घोडा रिंगण ......

  सोमवारी घोडा रिंगण या पालखी सोहळ्याचे घोडा रिंगण सोमवारी दुपारी 3 वाजता जायभायवाडी येथे होणार असून हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची  मोठी गर्दी होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार