पोस्ट्स

पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !_

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माजलगावांत सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महायुतीचे आवाहन; गडकरींच्या सभेने पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !  माजलगाव, ।दिनांक ०९। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांची माजलगाव येथे उद्या शुक्रवारी दुपारी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.       भाजप महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची सुरुवातीपासूनच प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाई येथे सभा झाली. त्यानंतर आता  माजलगाव येथे विकासपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खास पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी येत आहेत. शुक्रवार, दि. १० मे २०२४ रोजी दुपारी १२:०० वा.  जुना मोंढा, येथे ही  सभा होणार आहे. “सबका साथ सबका विकास” सूत्र डोळ्यासमोर ठेऊन, गरीब कल्याणाचा

कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे किर्तन

इमेज
  कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे किर्तन धारूर (प्रतिनिधी) :- कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.१० मे रोजी ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर व दि.११ मे विश्वस्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.३ शके १९४६ शुक्रवार दि.१० मे २०२४ रोजी आयोजन क

विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न

इमेज
  भारतीय संस्कृतीचा पाया असणारी कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत -ॲड. रोहित सर्वज्ञ  विद्याभारती देवगिरी प्रांताची विमर्श विषयावरील कार्यशाळा संपन्न ................... दिनांक आठ मे प्रतिनिधी  राष्ट्रीय संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असणारी एकत्रित कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन असणारे विमर्श प्रस्थापित करून हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. चुकीचे विमर्श समाजावर थोपविले जात आहेत त्यामुळे समाजातील प्रज्ञावंतांनी अभ्यासपूर्वक प्रकट व्हायला हवे. चुकीचे तात्विक,सैद्धांतिक विमर्श समाजासमोर स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विमर्श विभागाचे प्रांतप्रमुख ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी व्यक्त केले.  विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या वतीने नांदेड येथे विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नांदेड येथील सहयोग कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण वर्ग दिनांक 7 मे ते 8 मे कालावधीत पार पडला. यावेळी

खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पंतप्रधानांच्या आशिर्वादाचा वरदहस्त आणि डोक्यावर लाडाची टपली !

इमेज
  खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पंतप्रधानांच्या आशिर्वादाचा वरदहस्त आणि डोक्यावर लाडाची टपली ! अंबाजोगाई, प्रतिनिधी.....   बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई येथे विराट जाहीर सभा झाली. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन विद्यमान खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केलं. गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संसदेत काम करणाऱ्या खा.डॉ प्रीतमताई मुंडे यांना भाषण संपल्यानंतर भेटताना पंतप्रधानांनी डोक्यावर वरदहस्त ठेवत त्यांना आशीर्वाद दिला. एवढेच नाही तर जाता जाता खा. प्रीतम मुंडेंच्या डोक्यावर लाडाने टपलीही मारली. ■ Click :  *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*           बीड लोकसभेच्या विद्यमान खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या ऐवजी यावेळी लोकसभेसाठी  पंकजाताई मुंडे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. पंकजाताई मुंडे यांचा विक्रम

घाटनांदूर वरून अंबाजोगाई रेल्वे मार्गाला जोडली जावी - मुंडेंची मागणी

इमेज
  गोदावरी तुटीचे खोरे पाण्याने भरून जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी लोकसभेत पंकजाताईची गॅरंटी हवी - धनंजय मुंडे आजची मोदींजींची सभा विजयाचा संकल्प करण्याची नसून पंकजाताईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी - धनंजय मुंडे घाटनांदूर वरून अंबाजोगाई रेल्वे मार्गाला जोडली जावी - मुंडेंची मागणी अंबाजोगाई (दि. 07) - बीड जिल्ह्यात जवळपास सात लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती ही जिरायती आहे. गोदावरीचे 165 टीएमसी तुटीचे खोरे भरून काढण्याच्या प्रकल्पास महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. हे तुटीचे खोरे भरून काढल्यास बीड जिल्ह्याला किमान 42 टीएमसी इतके पाणी मिळेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती ही बागायती होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे प्रस्तावित खर्च एक लाख 17 हजार कोटी इतका असून, राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित अर्थसहाय्य याचबरोबर अन्य बँकांच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी मोदींजींची विकासाची गॅरंटी पंकजाताई जिल्ह्यासाठी पूर्ण करू शकते, असा विश्वास कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोद

तुम्हीच माझे मुंडे साहेब, तुम्हीच माझी उर्जा

इमेज
  मतदारांनो,जातीय सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका-पंकजाताई मुंडे यांचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत पंकजाताई मुंडेंचं दमदार भाषण मोदींकडे आग्रह करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी प्रयत्न करणार मोदीजींची परवानगी समजून मुस्लिमांना वचन देते की, हा देश जेवढा तुमच्या आजोबा पणजोबांचा आहे तेवढाच तुमचा देखील राहिल अंबाजोगाई । दिनांक ०७। ही निवडणूक देशाचे आणि जिल्ह्याचं भलं करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर आपल्याला लढवायची आहे. त्यामुळे मतदारांनो, निवडणूकीत जातीय सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जिल्ह्यात मतदानरूपी आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत.मोदींकडे आग्रह करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी आगामी काळात मी प्रयत्न करणार आहे. मोदीजींची परवानगी समजून मुस्लिमांना वचन देते की, हा देश जेवढा तुमच्या आजोबा पणजोबांचा आहे तेवढाच तुमचा देखील राहिल. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला आपले मतरुपी आशीर्वाद द्या, तुमचे मत विकासासाठी सत्कारणी लावेल अशी ग्वाही भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथ

अंबाजोगाईच्या विराट जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले जनतेचे आशीर्वाद

इमेज
  गोपीनाथजी मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी बेटी पंकजावर सोपवलीयं  अंबाजोगाईच्या विराट जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले जनतेचे आशीर्वाद मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढून पंकजाताई मुंडे यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन अंबाजोगाई । दि. ७ । गोपीनाथजी मुंडे  आणि माझे नाते स्नेहाचे होते, म्हणूनच देशाने जेव्हा २०१४ मध्ये मला पहिल्यांदा सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळी बीडमधून गोपीनाथ मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये सोबत काम करण्यासाठी घेऊन गेलो होतो, मात्र नियतीने घात केला आणि मुंडेजी आपल्या सर्वापासून हिरावले गेले. मात्र आता दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी 'बेटी पंकजा" मुंडेंवर सोपवली आहे, त्यामुळे येत्या १३ तारखेला पंकजा मुंडे यांना आपण प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी

_पंकजाताईंना सर्व जाती धर्मातील लोक प्रचंड मताधिक्य देवून विजयी करणार !

इमेज
  देशाचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, ज्यांनी बदललं तेच चुकीचे आरोप करत आहेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही चंदनतस्कराला शोधा आणि बीड जिल्ह्यातील लोकहो तुम्ही त्याला १३ तारखेला गाडा - ना.रामदास आठवले पंकजाताईंना सर्व जाती धर्मातील लोक प्रचंड मताधिक्य देवून विजयी करणार ! अंबाजोगाई, ।दिनांक०७। 'बीड जिल्ह्यात विकासाची गायची असेल अंगाई तर संसदेत पाठवा आपली पंकजाताई' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. कोणीही संविधान बदलणार नाही या बुद्धिभेदाला कोणी बळी पडणार नाही. राहुल गांधीच्या भाषणावर बंदी आणावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे.काँग्रेस तुम्हाला भडकावण्याचं काम करत आहे.पण त्यांना कोणी भीक घालणार नाही. पंकजाताई प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असा मला विश्वास असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.           सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारे गोपीनाथ मुंडे होते.नामांतर चळवळीत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंचे मोठे योगदान होते. त्यामुळे प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंचा नामांतरात होता मोठा वाटा,१३ तारखेला महाविकास आघाडीचा काढा काटा, गोपीनाथ मुंडे

महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार*

इमेज
   मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंकजाताई मुंडे साहेबांची लेक, कुठून आली ही तुतारी चल उचलून फेक ; महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार अंबाजोगाई, ।दिनांक ०७। महायुतीच्या तळपत्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार आहे. 21 व्या शतकातील सक्षम भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघातून आमचे मित्र गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करा. बीड जिल्ह्यातून एक इतिहास निर्माण करा. बीडमध्ये येत्या 4 जूनला तुतारी उचलून फेका..तिची पिपाणी झाल्याचे दिसले पाहिजे एवढं मताधिक्य पंकजाताईंना द्या असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.    बोला परळी वैजनाथ महाराज की जय अशा उद्घोषनेने आपल्या भाषणाची सुरुवात करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले की, राज्यातलं  तापमान सध्या 40 च्या पुढे गेलंय आणि चार तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल आणि देशात

नमामि वैद्यनाथम् : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी प्रभू वैद्यनाथाचा जयकारा !

इमेज
  नमामि वैद्यनाथम् : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी प्रभू वैद्यनाथाचा जयकारा ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथच्या वास्तव्याने पूनित झालेल्या भूमीमध्ये जाहीर सभा होत असताना आवर्जून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रभू वैद्यनाथाला नमन करून केली. 'परळी वैजनाथ च्या वैद्यनाथाला मी नमन करतो' या मराठी भाषेतील वाक्याने भाषण सुरु केले.त्याचबरोबरच 'परळी वैजनाथ भगवान की जय' अशा प्रकारचा जयकारा करत बीड जिल्ह्यातील या जाहीर सभेत त्यांनी बोलायला सुरुवात केली.         भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई येथे विराट जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना 'हर हर महादेव' चा जयघोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू-वैद्यनाथाचा जयकारा करूनच आपले भाषण सुरू केले. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी राज्याचे मुख

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारर्थ सांडस चिंचोली येथे बैलगाडी फेरी काढून मतदारांशी सवांद

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारर्थ सांडस चिंचोली येथे बैलगाडी फेरी काढून मतदारांशी सवांद जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य द्या - रमेशराव आडसकार माजलगाव दि. 7        जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून नावलौकिक वाढवण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन भाजपचे जेष्ठ रमेशराव आडसकर यांनी केले. सांडस चिंचोली येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीमधून फेरी काढून मतदारांशी सवांद साधला. मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. पंकजाताई मुंडे यांनाच विक्रमी मतांनी निवडून देणार असल्याची ग्वाही दिली.              बीड लोकसभेच्या भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाई - रासप - मनसे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज सांडस चिंचोली येथे बैल गाडीतून प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आडसकर म्हणाले की, पंकजाताई मुंडे यांना विकासाची दृष्टी आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्री असताना त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावली असून त्यांच्या अनेक योजना   

ऐन उन्हाळ्यात वैद्यनाथ मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

इमेज
श्री वैद्यनाथ देवस्थानने  सावलीसाठी मंडप उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय-अभयकुमार ठक्कर ऐन उन्हाळ्यात वैद्यनाथ मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार ! परळी वैजनाथ/ प्रतिनिधी –  एप्रिल संपला आता मे महिना चालू झाला असून उन्हाचा पारा 40 अंशांपर्यंत पोचला आहे. उन्हाचे चटके भाविकांना मोठ्या प्रमाणात बसत असून श्री वैद्यनाथ मंदिर प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे श्री वैद्यनाथ मंदिरात भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी  मंडप उभारणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष श्री अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केली असून लवकरात लवकर मंडप उभारणी करून भाविकांची होणारी पायपोळ थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.   याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यंदा हे महिना उजाडला, तरीही वैद्यनाथ देवस्थान कमिटीकडून अद्याप मंडप उभारण्यात आलेला नाही. यामुळे भाविकांना मंदिर परिसरात उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी ९ पास

पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम

इमेज
परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी वेदाशिवाय दुसरा ग्रंथ नाही :-  सद्गुरु श्री. चंद्रशेखर महाराज देगलूरकर नांदेडला श्री याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम संपन्न  ............. नांदेड प्रतिनिधी सहा मे मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी वेदांशिवाय दुसरा ग्रंथ नाही. भारतीय संस्कृतीचे मूळ वेदांमध्ये असून वेदाभ्यास हा महत्त्वाचा आहे. धर्म व अधर्म या क्रिया शास्त्राने सांगाव्या लागतात. समोरच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी एखादी क्रिया करणे म्हणजे धर्मकार्य आहे असे प्रतिपादन सद्गुरु ह.भ‌.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी केले. श्री महर्षी याज्ञवल्क्य सेवा प्रतिष्ठान नांदेड, द्वारा संचलित वामननगर परिसरातील श्री याज्ञवल्क्य  वेदपाठशाळेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सद्गुरूंच्या अमृतवाणीतून प्रवचनाचे आयोजन अशोक नगर येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये करण्यात आले होते.  पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम दिनांक 4 व 5 मे रोजी वे.शा.सं. मनोजगुरुजी जोशी पेठवडजकर यांच्या पुढाकाराखाली ब्रह्मवृंदा

सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा

इमेज
  सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा माजलगाव, दि.5 : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बीड सकल चर्मकार समाजाच्यावतीने आज माजलगावात मेळावा घेत जाहीर पाठींबा देण्यात आला. चर्मकार समाजासाठी भाजपा सरकारने अनेक योजना राबविल्या असून त्याचा फायदा समाजातील विविध घटकांना झालेला आहे. त्यामुळे समाजाने एकमुखाने निर्णय घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव विधानसभा प्रमुख मोहनराव जगताप, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत पाटील, अच्युतराव लाटे, अमरनाथ खुर्पे, कृऊबा सभापती मंगेश तोंडे, संजावनी राऊत, राहुल साळुंके, रविंद्र बोराडे, सुनिता नेटके, शारदा वाघमारे यांची उपस्थिती होती. माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकार हे गोरगरींबांसाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगात उंचावल

विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा

इमेज
 आ.संदीप क्षीरसागरांना ऐन निवडणुकीत धक्का, पंकज बाहेगव्हाणकरांनी सोडली साथ विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा बीड (प्रतिनिधी) - आ.संदीप क्षीरसागर यांना ऐन लोकसभा निवडणुकीत धक्का बसला असून, त्यांचे जुने सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी आज पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  आ.संदीप क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतील कंटाळून आधीही त्यांच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. पंकज बाहेगव्हाणकर हे स्व.अच्युतराव बाहेगव्हाणकर यांचे पुत्र असून, अनेक वर्ष संदीप क्षीरसागर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  दरम्यान आठवडाभरावर लोकसभेचे मतदान होणार असून आमदार साहेब किंवा पक्षाचे बीड विधानसभा क्षेत्रात काहीही नियोजन दिसत नाही, समोरून उमेदवार मॅनेज असल्याचे आरोप होत असताना प्रचार यंत्रांना ठप्प असतील तर कार्यकर्त्यांनी काय समजावे? असा उद्विग्न सवाल पंकज यांनी उपस्थित केला असून, आपल्या पुढील वाटचालीची दिशा ल

पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली: नागरिकांनी नोंद घ्यावी

इमेज
 7 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा:अंबाजोगाईतील वाहतूक व्यवस्थेत बदल पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली: नागरिकांनी नोंद घ्यावी अंबाजोगाई, प्रतिनिधी......      भाजप महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 मे ला  अंबाजोगाई येथे जाहीर सभा होणार आहे.या अनुषंगाने अंबाजोगाईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असुन याबाबतची अधिसुचना पोलीस प्रशासनाने काढली आहे.दि.7 रोजी दिवसभरात पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असुन नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.           दिनांक 07/05/2024 रोजी कृषी महाविदयालय, अंबाजोगाई ता अंबाजोगाई जि बीड येथे नरेंद्र मोदी (पंतप्रधान भारत सरकार) यांचा सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवर  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.या सभेकरीता अंबाजोगाई येथे मोठ्या संख्येने नागरिक,कार्यकर्ते वाहनासह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.यावेळी वाहतुकीची कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरीकांच्या

घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले

इमेज
  घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले …………………………………………. गेवराई - प्रतिनिधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी करण्याचे ठरवलेले आहे. गेवराई पोलिसांना खामगाव चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येत असताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये एक पैसे असलेली लोंखडी पेटी सापडली. त्यामध्ये एक कोटी रुपये   रुपयांची रोकड या ठिकाणी मिळून आली.  खामगाव या ठिकाणी चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एस.एस.टी पथक खामगाव ता. गेवराई जि.बीड येथुन पथकातील पोकॉ खांडेकर यांनी कळविले की ,वाहन तपासणी करीत अंसताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये  पैसे असलेली एक  लोखंडी पेटी असुन त्यामध्ये एक कोटी रुपये आहेत. सदर बाबत माहिती अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार   व पोनि गेवराई यांना माहिती देवुन सदर ठिकाणी भेट दिली. सदर रक्कम वाहतुकी बाबत निवडणुक आयोगाचे बारकोड इ.एस.एम.एस ची कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने सदर एक कोटी रक्कम व इनोव्हा वाहन  हे दोन पंचासमक्ष पथक प्रमुख मह

‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प

इमेज
  तांडयांना विकासाचा स्पर्श देणाऱ्या पंकजाताईंना शंभर टक्के मतदान देऊन लोकसभेत पाठवू खा. प्रितमताई मुंडे यांचा गेवराई तालुक्यातील तांडे-वस्त्यांवर प्रचार  ‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प  गेवराई । दिनांक ०४ । बंजारा समाजाच्या प्रत्येक गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांना भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यांनी दिलेल्या निधीमुळेच दुर्लक्षित तांड्याना विकासाचा स्पर्श होऊन विकासधारेच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेला बंजारा समाज आता मुख्य प्रवाहात आला आहे. आमच्या तांडयांना विकासाचा स्पर्श दिल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाज शंभर टक्के पंकजाताईंना मतदान देऊ आणि ताईंना लोकसभेत पाठवू असा निर्धार गेवराई तालुक्यातील बंजारा समाजाने केला. भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील तांडे, वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सुरुवातीला खांडवी तांडा येथे भेट दिल्यानंतर सेवाधाम येथील मंदिरात संत सेवालाल महाराज यांचे दर्शन करून पांगरी तां

जोरदार प्रचार :कामगिरी दमदार

इमेज
  पंकजाताई मुंडेंसाठी रमेश आडसकरांचा माजलगावात घरोघरी जाऊन प्रचार जिल्ह्याला विकसित करायचे असेल पंकजाताई मुंडे विक्रमी मताधिक्याने विजयी होणे आवश्यक - रमेश आडसकर माजलगाव (दिनांक 4) जिल्हा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केले.. आज पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांनी माजलगाव मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.          बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप मनसे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव शहरांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी भव्य पदयात्रा काढून मतदारांशी थेट घरोघरी जाऊन संवाद साधला. पंकजाताई मुंडे या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या असून राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेली काम आजही चर्चेला जात आहेत. पंकजाताई मुंडे यांनी जलजीवांच्या माध्यमातून मराठवाड्यात अनेक कामे करून पाणी पातळीमध्ये वाढ करण्यामध्ये त्यांचे
इमेज
  बजरंग सोनवणे यांना केज तालुक्यातून आणखी एक धक्का सोनवणेंच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश परळी वैद्यनाथ (दि. 04) - महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे.  मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, सदस्य सुंदर लाड, बालासाहेब हारगावकर, अश्रुबाई जनार्दन लाड, मेघराज लाड, तुकाराम लाड, शरद हारगावकर, कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे, अक्षय लाड, विनायक लाड, दशरथ लाड यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध

गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ

इमेज
  पंकजाताई मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष-अश्विन मोगरकर  गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ परळी वैजनाथ       एलईडी चित्र रथाच्या माध्यमातून पंकजाताई यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचणार असून पंकजाताई मुंडे यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते अश्विन मोगरकर यांनी सांगितले.        बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा शनिवारी  मतदार व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धडाक्यात शुभारंभ करण्यात आला.  लोकसभा 2024 च्या प्रचार आता रंगतदार स्थितीत आला आहे. 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर  बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे. शनिवार दि 4 मे रोजी गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गणेशपार भागातील जेष्ठ नागरिकांच्या

15 सप्टेंबर पर्यंत मुदत

इमेज
  पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन 15 सप्टेंबर पर्यंत मुदत नवी दिल्ली, 02: केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील.   पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार 'उत्कृष्ट कार्याच्या' सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे / विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक क

आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर

इमेज
  चिंचाळ्यात पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाने मतदार भावूक ! जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना क्रमांक एकची पसंती देण्याचा निर्धार आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर चिंचाळा (वडवणी) ।दिनांक ०२। भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज केलेल्या अभ्यासपूर्ण आणि विकासाचे व्हिजन घेऊन केलेल्या भाषणाने मतदार अक्षरशः भावूक झाले होते. जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना सर्वाधिक क्रमांक एकची मते देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.     पंकजाताई मुंडे यांची दुपारी चिंचाळ्यात सभा झाली. सर्व जाती धर्माचे मतदार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते रमेश आडसकर, मोहनराव जगताप, केशवराव आंधळे, जयसिंह सोळंके, वडवणी नगराध्यक्ष शेषराव जगताप, बाबरी मुंडे, संजय आंधळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, शिवाजीराव तिडके, आजबे ताई, मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, शहराध्यक्ष करण लोंढे, बीड एम पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  पंकजाताई भाषणात म्हणाल्या, 2004 तसेच 2009 मध्ये जिल्हयात फिरत असताना रस्ते खूप खराब होते. सोयी

धनंजय मुंडेंनी साधला परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद

इमेज
  परळीची व्यापार पेठ समृद्ध व अर्थसंपन्न ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताईला मतदान रुपी आशीर्वाद - द्या धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी साधला परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद परळी वैद्यनाथ (दि. 03) - परळीची व्यापार पेठ ही वर्षानुवर्षे उत्कर्षाकडे वाटचाल करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये परळीच्या अवतीभोवती विणले जात असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, रेल्वे वाहतूक, त्याचबरोबर नव्याने झालेली एमआयडीसी, तिथे येणारे उद्योग या सर्वांचा उहापोह करता परळीची व्यापार पेठ ही अधिक समृद्ध आणि अर्थसंपन्न होणार असून याकरिता केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे व्यापार पेठीची अर्थसंपन्नता वाढवायच्या दृष्टीने शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताई च्या पाठीशी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या सर्व शक्तीनिशी उभे राहावे व मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे व्यापारी संवाद बैठकीमध्ये बोलताना केले आहे.  परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्या पुढाकारातून बीड लोक