‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प

 तांडयांना विकासाचा स्पर्श देणाऱ्या पंकजाताईंना शंभर टक्के मतदान देऊन लोकसभेत पाठवू

खा. प्रितमताई मुंडे यांचा गेवराई तालुक्यातील तांडे-वस्त्यांवर प्रचार 


‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प 


गेवराई । दिनांक ०४ । बंजारा समाजाच्या प्रत्येक गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांना भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यांनी दिलेल्या निधीमुळेच दुर्लक्षित तांड्याना विकासाचा स्पर्श होऊन विकासधारेच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेला बंजारा समाज आता मुख्य प्रवाहात आला आहे. आमच्या तांडयांना विकासाचा स्पर्श दिल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाज शंभर टक्के पंकजाताईंना मतदान देऊ आणि ताईंना लोकसभेत पाठवू असा निर्धार गेवराई तालुक्यातील बंजारा समाजाने केला.


भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील तांडे, वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सुरुवातीला खांडवी तांडा येथे भेट दिल्यानंतर सेवाधाम येथील मंदिरात संत सेवालाल महाराज यांचे दर्शन करून पांगरी तांडा,जातेगाव तांडा, दामू नाईक तांडा,जयराम नाईक तांडा, वसंत नगर तांडा येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, शिवराज पवार, प्रा.टी.पी. चव्हाण, जगन अडागळे, बालाजी सातपुते, दीपक सुरवसे, भूषण पवार, विजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, सुरेश पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.


ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना न्याय दिला आहे.आपल्या विकास कामांच्या माध्यमातून पंकजाताई प्रत्येक व्यक्तीच्या घरात आणि मनात स्थान निर्माण करून आहेत. ग्रामीण भागातील तांड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या दुर्लक्षित घटकांनी संघर्षाच्या काळात आम्हाला माया दिली आहे. सामान्य लोक आमच्या वाट्याचा संघर्ष वाटून घेतात, आजही या संघर्षाच्या काळात तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल असा विश्वास खा. प्रितमताई मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व बीड जिल्हा जातपात, मतभेद विसरून ताईंना लोकसभेत पाठवण्यासाठी कामाला लागला आहे. विकासाच्या धोरणला प्राधान्य देऊन पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिलेल्या बीड जिल्ह्याची ही एकजूट अशीच कायम ठेवून पंकजाताईंच्या विजयात मताधिक्याचे योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी केले. 


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !