धनंजय मुंडेंनी साधला परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद

 परळीची व्यापार पेठ समृद्ध व अर्थसंपन्न ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताईला मतदान रुपी आशीर्वाद - द्या धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंनी साधला परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद


परळी वैद्यनाथ (दि. 03) - परळीची व्यापार पेठ ही वर्षानुवर्षे उत्कर्षाकडे वाटचाल करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये परळीच्या अवतीभोवती विणले जात असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, रेल्वे वाहतूक, त्याचबरोबर नव्याने झालेली एमआयडीसी, तिथे येणारे उद्योग या सर्वांचा उहापोह करता परळीची व्यापार पेठ ही अधिक समृद्ध आणि अर्थसंपन्न होणार असून याकरिता केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे व्यापार पेठीची अर्थसंपन्नता वाढवायच्या दृष्टीने शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताई च्या पाठीशी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या सर्व शक्तीनिशी उभे राहावे व मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे व्यापारी संवाद बैठकीमध्ये बोलताना केले आहे. 


परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्या पुढाकारातून बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीतील विविध सर्व व्यापारी बांधवांची संयुक्त बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सर्व व्यापारी बांधवांशी संवाद साधला. 


परळीची कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील निवडक श्रीमंत बाजार समिती यापैकी एक आहे. तुटीच्या खोऱ्यातील बीड जिल्ह्याच्या हक्काचे 42 टीएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेल्या कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीत होईल त्याचबरोबर वाढते आधुनिकीकरण व अभियांत्रिकीच्या युगात झपाट्याने होत असलेल्या विकासामध्ये परळीची व्यापार पेठ देखील अधिकाधिक समृद्ध होईल असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे त्यासाठी संसदेमध्ये पहिल्या ओळीत बसणारा वजनदार खासदार आपला असावा असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 


सर्व व्यापारी बांधवांनी सर्व शक्तीनिशी पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करावेत असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील भाई कुरेशी, राजेश देशमुख, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, ज्ञानोबा माऊली फड, शांतीलाल जैन, विजय वाकेकर, गुलाबराव शेटे, सुनील कोटेचा, सुरेश मुंडे, आत्माराम काळे, कांकरिया शेठ, नाजर भाई, माऊली मुंडे, सुधाकर ढाकणे, सचिन तोतला, दरक शेठ, रघुवीर देशमुख, माणिक कांदे, रामभाऊ चौंडे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !