गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ

 पंकजाताई मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष-अश्विन मोगरकर 


गणेशपार भागात एलईडी चित्र रथाद्वारे प्रचाराचा शुभारंभ

परळी वैजनाथ 

     एलईडी चित्र रथाच्या माध्यमातून पंकजाताई यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचणार असून पंकजाताई मुंडे यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते अश्विन मोगरकर यांनी सांगितले.

       बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा शनिवारी  मतदार व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धडाक्यात शुभारंभ करण्यात आला. 

लोकसभा 2024 च्या प्रचार आता रंगतदार स्थितीत आला आहे. 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर  बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे. शनिवार दि 4 मे रोजी गणेशपार भागात एलईडी व्हॅन द्वारे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गणेशपार भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या एलईडी व्हॅन द्वारे पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाभरात केलेली विकासकामे लोकांसमोर जाणार आहेत. यामाध्यमातून 2024 च्या लोकसभेत पंकजाताई मुंडे प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास युवानेते अश्विन मोगरकर यांनी व्यक्त केला.

या LED व्हॅन द्वारे पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकासमंत्री व खा. प्रितमताई मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या बीड जिल्ह्यातील केलेली विकासकामे, जलयुक्त शिवार, अहमदनगर ते आष्टी पर्यंत आलेली रेल्वे, जिल्ह्यातील रस्ते, समाज उपयोगी कामे चित्रफितीत दाखवण्यात येत आहे. ही चित्रफीत पहाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, भाजपा नेते अश्विन मोगरकर, शिवसेनेचे सचिन स्वामी, बालासाहेब देशमुख, भाजपा जेष्ठ नेते खदीरभाई टेलर, फरीद नवाब यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !