इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

घाटनांदूर वरून अंबाजोगाई रेल्वे मार्गाला जोडली जावी - मुंडेंची मागणी

 गोदावरी तुटीचे खोरे पाण्याने भरून जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी लोकसभेत पंकजाताईची गॅरंटी हवी - धनंजय मुंडे


आजची मोदींजींची सभा विजयाचा संकल्प करण्याची नसून पंकजाताईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी - धनंजय मुंडे


घाटनांदूर वरून अंबाजोगाई रेल्वे मार्गाला जोडली जावी - मुंडेंची मागणी


अंबाजोगाई (दि. 07) - बीड जिल्ह्यात जवळपास सात लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती ही जिरायती आहे. गोदावरीचे 165 टीएमसी तुटीचे खोरे भरून काढण्याच्या प्रकल्पास महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. हे तुटीचे खोरे भरून काढल्यास बीड जिल्ह्याला किमान 42 टीएमसी इतके पाणी मिळेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती ही बागायती होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे प्रस्तावित खर्च एक लाख 17 हजार कोटी इतका असून, राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित अर्थसहाय्य याचबरोबर अन्य बँकांच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी मोदींजींची विकासाची गॅरंटी पंकजाताई जिल्ह्यासाठी पूर्ण करू शकते, असा विश्वास कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे आयोजित विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे बोलत होते. 


सभेला उपस्थित विराट जनसमुदाय पाहून ही सभा विजयाचा संकल्प करणारी नाही तर पंकजाताईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 


बीड जिल्ह्याच्या नावापुढे लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेती जलयुक्त करणे, उस तोडणाऱ्या हातांना ऊस उत्पादक बनवणे, इथल्या लोकांना इथेच रोजगार मिळवून देणे, हे आमचे ध्येय असून, यासाठी पंकजाताईला संसदेत पाठवणे आवश्यक आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.


दरम्यान बीड जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे काम वेगाने सुरू असून, अंबाजोगाईला देखील घाटनांदूर वरून रेल्वेला जोडण्याची आमची अनेक वर्षांची मागणी सुद्धा आगामी काळात पंकजाताई या मोदींजींच्या नेतृत्वात पूर्ण करतील, अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


मुंडे बंधू भगिनीने मिळून मोदींजींना बांधला फेटा


दरम्यान या सभेस संबोधित करण्यासाठी आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठवाड्याची ओळख असलेला खास फेटा पंकजाताई मुंडे यांनी दिला, तो फेटा धनंजय मुंडे यांनी बांधून व्यवस्थित बसवून दिला.


■ Click:

 *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या