पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारर्थ सांडस चिंचोली येथे बैलगाडी फेरी काढून मतदारांशी सवांद

 पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारर्थ सांडस चिंचोली येथे बैलगाडी फेरी काढून मतदारांशी सवांद


जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य द्या - रमेशराव आडसकार


माजलगाव दि. 7

       जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून नावलौकिक वाढवण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन भाजपचे जेष्ठ रमेशराव आडसकर यांनी केले. सांडस चिंचोली येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीमधून फेरी काढून मतदारांशी सवांद साधला. मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. पंकजाताई मुंडे यांनाच विक्रमी मतांनी निवडून देणार असल्याची ग्वाही दिली.

             बीड लोकसभेच्या भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाई - रासप - मनसे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज सांडस चिंचोली येथे बैल गाडीतून प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आडसकर म्हणाले की, पंकजाताई मुंडे यांना विकासाची दृष्टी आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्री असताना त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावली असून त्यांच्या अनेक योजना   जलसंधारणाच्या कामाने राज्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्येही पाणी पातळी वाढली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. जिल्ह्यात उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देण्याची क्षमता पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये आहे म्हणून मतदारांनी कोणत्याही भूलथापांना आणि दिशाभूलांना बळी न पडता पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी ताकत उभी करावी असे आवाहन आडसकर यांनी केले.

      यावेळी भाजपचे जेष्ठ नेते डॉ. प्रकाशराव आनंदगांवकर, तालुकाअध्यक्ष आरुण राऊत*मा. नगरअधक्ष डॉ. अशोकराव तिडके, आनंतराव शेंडगे, भरत सोळंके, हरिभाउ चंदनशीव, नारायण शेजुळ, महेश भोसले आदी उपस्थीत होते. या प्रचारफेरी ला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंकजाताई यांना प्रचंड मताने विजयी करू असा शब्द मतदारांनी एकमुखी दिला.

----------------------------------------------

■ Click:

 *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी