विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा

 आ.संदीप क्षीरसागरांना ऐन निवडणुकीत धक्का, पंकज बाहेगव्हाणकरांनी सोडली साथ

विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा


बीड (प्रतिनिधी) - आ.संदीप क्षीरसागर यांना ऐन लोकसभा निवडणुकीत धक्का बसला असून, त्यांचे जुने सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी आज पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 


आ.संदीप क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतील कंटाळून आधीही त्यांच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे.


पंकज बाहेगव्हाणकर हे स्व.अच्युतराव बाहेगव्हाणकर यांचे पुत्र असून, अनेक वर्ष संदीप क्षीरसागर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 


दरम्यान आठवडाभरावर लोकसभेचे मतदान होणार असून आमदार साहेब किंवा पक्षाचे बीड विधानसभा क्षेत्रात काहीही नियोजन दिसत नाही, समोरून उमेदवार मॅनेज असल्याचे आरोप होत असताना प्रचार यंत्रांना ठप्प असतील तर कार्यकर्त्यांनी काय समजावे? असा उद्विग्न सवाल पंकज यांनी उपस्थित केला असून, आपल्या पुढील वाटचालीची दिशा लवकरच ठरवणार असल्याचेही पंकज बाहेगव्हाणकर यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी