इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार*

  मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पंकजाताई मुंडे साहेबांची लेक, कुठून आली ही तुतारी चल उचलून फेक ; महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार


अंबाजोगाई, ।दिनांक ०७।

महायुतीच्या तळपत्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार आहे. 21 व्या शतकातील सक्षम भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघातून आमचे मित्र गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करा. बीड जिल्ह्यातून एक इतिहास निर्माण करा. बीडमध्ये येत्या 4 जूनला तुतारी उचलून फेका..तिची पिपाणी झाल्याचे दिसले पाहिजे एवढं मताधिक्य पंकजाताईंना द्या असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


   बोला परळी वैजनाथ महाराज की जय अशा उद्घोषनेने आपल्या भाषणाची सुरुवात करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले की, राज्यातलं  तापमान सध्या 40 च्या पुढे गेलंय आणि चार तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल आणि देशातला 400 पार होणार आहे. महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्य़ात काय होणार ? याची चिंताच नाही. पंकजाताईंचा विक्रमी विजय केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हा संकल्प करा. बीडमधून तुतारीची  पिपाणी करा. विकासाची कास धरा.कारण देशांमध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे मोदी गॅरंटीआणि आता देशातल्या लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणण्याची. त्यामुळे पंकजाताईंची साथ सोडू नका असे आवाहन त्यांनी केले.

       पंतप्रधान मोदींना उद्देशुन मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमच्या बीडची जनता निर्मळ मनाची आहे.मनात काहीही खोट नाही.ज्याला स्विकारलं त्याची साथ कधीही सोडत नाही.बीडच्या जनतेने आमचे मुंडेंना सदैव प्रेम दिलं त्यांचा सदैव सन्मान केला.आज तेच प्रेम व साथ पंकजाताईंना ही जनता देत आहे. त्यामुळे पंकजाताईना विजयी करुन विकासाला ही जनता नक्कीच साथ देणार असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजाताईंना मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे.ही निवडणूक पंकजाताईंची किंवा तुमची आमची नाहीये ही निवडणूक देश व महाराष्ट्र घडवणारी आहे. ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. ही  निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.म्हणून येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


मराठा समाजाने कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये

------

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज बांधवांना खास करून आवाहन केले त्यांनी सांगितले की, काही लोक मराठा समाजामध्ये संभ्रम पसरवतात पण आपल्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. कोणत्याही समाजाला धक्का न लावता ते कोर्टात टिकवले. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही परंतु आपण दिल्यानंतर ते कोर्टात जातात. परंतु  आपलं सरकार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवणार. कायद्याच्या चौकटीत बसवणार आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं पण काम सुरू केलं.सगेसोयरेचं पण सुरु आहे. ओबीसी समाज व  इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे. म्हणून तुम्ही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही कुठेही दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका. अठरापगड जाती धर्माच्या विकासाची गॅरंटी घेणाऱ्या, वंचित उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लोकसभेत विक्रमी मताधिकाने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

••••

Click:

 *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या