इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली: नागरिकांनी नोंद घ्यावी

 7 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा:अंबाजोगाईतील वाहतूक व्यवस्थेत बदल


पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली: नागरिकांनी नोंद घ्यावी

अंबाजोगाई, प्रतिनिधी......
     भाजप महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 मे ला  अंबाजोगाई येथे जाहीर सभा होणार आहे.या अनुषंगाने अंबाजोगाईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असुन याबाबतची अधिसुचना पोलीस प्रशासनाने काढली आहे.दि.7 रोजी दिवसभरात पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असुन नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
          दिनांक 07/05/2024 रोजी कृषी महाविदयालय, अंबाजोगाई ता अंबाजोगाई जि बीड येथे नरेंद्र मोदी (पंतप्रधान भारत सरकार) यांचा सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवर  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.या सभेकरीता अंबाजोगाई येथे मोठ्या संख्येने नागरिक,कार्यकर्ते वाहनासह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.यावेळी वाहतुकीची कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरीकांच्या वाहतुकीच्या वाहनांची गैरसोय होऊ नये. वाहतुकीच्या कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई ग्रामिण पो.स्टे. हद्दीतून खालील प्रमाणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक ठरते. म्हणून  पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे असे पोलीस प्रशासनाने अधिसूचनेत म्हटले आहे.

अशी असेल पर्यायी वाहतूक व्यवस्था :

अक्र 1
• सध्या वापरात असलेला मार्ग: बीड - केज- लोखंडी सावगांव टी पॉइंट पाण्याची टाकी यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई- परळी
•पर्यायी मार्ग :लोखंडी साबगांव टी पॉइंट वाघाळा साखर कारखाना - वाघाळा रोड, बायपास अंचाजोगाई भगवानवावा चौक- परळी

लोखंडी सावगांव टी पॉइंट वाघाळा साखर कारखाना - सेलु रोड- तथागत चांक- भगवानबाबा चौक- परळी

लोखंडी सावगांव टी पॉईट वाघाळा साखर कारखाना - पोखरी रोड, तथागत चौक- भगवानवावा चौक- परळी

अक्र 2.
• सध्या वापरात असलेला मार्ग: परळी अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण चौक लोखंडी सावरगांव- केज- वीड
•पर्यायी मार्ग :भगवानवावा चौक अंबाजोगाई तथागत चोक-पोखरी रोड- वाघाळा कारखाना- लोखंडी सावरगांव केज- बीड
अक्र 3.
• सध्या वापरात असलेला मार्ग: लातुर-आंबाजोगाई -परळी
•पर्यायी मार्ग :लातुर - पोखरी तथागत चौक- अंबाजोगाई भगवानबाबा चौक- अंबाजोगाई
अक्र 4.
• सध्या वापरात असलेला मार्ग: परळी- अंबाजोगाई- लातुर
•पर्यायी मार्ग : भगवानवावा चौक अंबाजोगाई तथागत चौक पोखरी- लातुर

               तरी कृषी महाविद्यालय, बीड रोड, अंबाजोगाई येथे सभा मर्गावरील वाहतुक (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील चाहने, अॅम्युलंन्स, अग्नीशामक दलाची वाहने यगळून) ही दिनांक 07/05/2024 रोजीचे सकाळी 09:00 वा. पासुन ते 18.00 वाजता सभा संपुन वाहतुक सुरळीत होईपर्यंत सर्व प्रकारची वाहतुक वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. याची सर्व वाहन चालका मालक यांनी नोंद घ्यावी व पर्यायी मगांचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक, बीड नंदकुमार ठाकूर  यांनी केले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या