जोरदार प्रचार :कामगिरी दमदार

 पंकजाताई मुंडेंसाठी रमेश आडसकरांचा माजलगावात घरोघरी जाऊन प्रचार


जिल्ह्याला विकसित करायचे असेल पंकजाताई मुंडे विक्रमी मताधिक्याने विजयी होणे आवश्यक - रमेश आडसकर


माजलगाव (दिनांक 4)

जिल्हा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केले.. आज पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांनी माजलगाव मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

         बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप मनसे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव शहरांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी भव्य पदयात्रा काढून मतदारांशी थेट घरोघरी जाऊन संवाद साधला. पंकजाताई मुंडे या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या असून राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेली काम आजही चर्चेला जात आहेत. पंकजाताई मुंडे यांनी जलजीवांच्या माध्यमातून मराठवाड्यात अनेक कामे करून पाणी पातळीमध्ये वाढ करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातही रस्त्याचे जाळे त्यांनी विणले असून विकासाची गती वाढवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना विजयी करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रमेशराव आडसकर यांनी केले. महायुतीच्या नेत्यांनी आज माजलगांव येथे गजानन नगर, शाहु नगर,सिद्धी विनायक मंदिर, बायपास रोड आदी भागात भव्य पदयात्रा काढून मतदारांशी घरोघरी जाऊन संवाद साधला. यावेळी जाहीरनामा व पत्रकांचे वाटपही करण्यात आले.

     भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रकाशराव आनंदगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ. अशोकराव तिडके, अच्युतराव लाटे, अनंतराव शेंडगे, डॉ. प्रशांत पाटील, राहुल लंगडे, विनायक रत्नपारखी, सतिश जोशी, आनंद कुलकर्णी, बाबासाहेब आगे, दत्ता महाजन, वैभव मिटकरी, छबन घाडगे व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे कार्यक्रते  पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !