युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले

 घबाड सापडलं: गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर एक कोटी रुपये पकडले



………………………………………….

गेवराई - प्रतिनिधी...

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी करण्याचे ठरवलेले आहे. गेवराई पोलिसांना खामगाव चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येत असताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये एक पैसे असलेली लोंखडी पेटी सापडली. त्यामध्ये एक कोटी रुपये   रुपयांची रोकड या ठिकाणी मिळून आली.

 खामगाव या ठिकाणी चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एस.एस.टी पथक खामगाव ता. गेवराई जि.बीड येथुन पथकातील पोकॉ खांडेकर यांनी कळविले की ,वाहन तपासणी करीत अंसताना इनोव्हा वाहन क्र.एम.एच.23 ए.डी.0366 मध्ये  पैसे असलेली एक  लोखंडी पेटी असुन त्यामध्ये एक कोटी रुपये आहेत. सदर बाबत माहिती अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार   व पोनि गेवराई यांना माहिती देवुन सदर ठिकाणी भेट दिली. सदर रक्कम वाहतुकी बाबत निवडणुक आयोगाचे बारकोड इ.एस.एम.एस ची कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने सदर एक कोटी रक्कम व इनोव्हा वाहन  हे दोन पंचासमक्ष पथक प्रमुख महेश मेटे वन विभाग यांनी पंचनामा करुन अति. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार   यांचे ताब्यात पुढील कारवाई साठी दिलेले आहेत. 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या