आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर

 चिंचाळ्यात पंकजाताई मुंडे यांच्या भाषणाने मतदार भावूक !


जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना क्रमांक एकची पसंती देण्याचा निर्धार


आडसकर-जगताप-जयसिंह सोळंकेंसह महायुतीचे नेते व्यासपीठावर




चिंचाळा (वडवणी) ।दिनांक ०२।

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज केलेल्या अभ्यासपूर्ण आणि विकासाचे व्हिजन घेऊन केलेल्या भाषणाने मतदार अक्षरशः भावूक झाले होते. जिल्हयाच्या विकासासाठी पंकजाताईंना सर्वाधिक क्रमांक एकची मते देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.


    पंकजाताई मुंडे यांची दुपारी चिंचाळ्यात सभा झाली. सर्व जाती धर्माचे मतदार बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते रमेश आडसकर, मोहनराव जगताप, केशवराव आंधळे, जयसिंह सोळंके, वडवणी नगराध्यक्ष शेषराव जगताप, बाबरी मुंडे, संजय आंधळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, शिवाजीराव तिडके, आजबे ताई, मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, शहराध्यक्ष करण लोंढे, बीड एम पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


 पंकजाताई भाषणात म्हणाल्या, 2004 तसेच 2009 मध्ये जिल्हयात फिरत असताना रस्ते खूप खराब होते. सोयी सुविधांचा अभाव होता. जिल्हयाला विकासाच्या वाटेवर न्यायच असेल तर अगोदर पायाभूत सोयी केल्या पाहिजेत हे विचारात घेऊन मंत्री असताना  विकासाचं नियोजन सुरू केलं. कामांचं डिझाईन स्वतः तयार केलं आणि त्यातून झालेली कामं आज दिसत आहेत.

राजकारणात थापा मारून यशस्वी होता येत नाही .राजकारणात चांगली माणसं रहावीत यासाठी तुमचा प्रयत्न आवश्यक आहे.

तुमचं माझं नातं अतुट आहे.

गरिबांच्या पोटी नुसत जन्म घेऊन उपयोगाचं नसत तर गरिबांविषयी कळवळा पाहिजे. मी गरिबांच्या पोटी जन्म घेतला नसला तरी गरीबाविषयी आस्था आहे, त्याचेसाठी खूप काहीतरी  करायचं. मुस्लिम बांधवांना विरोधक उगीच घाबरवत आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची...केंद्राचा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. भूल थापाना बळी पडू नका.शंभर टक्के मतदान करा.पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या.लेकीला बळ द्या असं आवाहन पंकजाताईंनी केलं.


*रमेश आडसकर, मोहन जगताप*

-----

पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना जेवढी कामं जिल्हयात तेवढी कुणाच्याच काळात झाली नाहीत. त्यांच्या रूपाने विकासाच व्हिजन असलेलं नेतृत्व लाभलं आहे. त्यांचा विजय तर निश्चित आहेच तथापि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन रमेश आडसकर, मोहन जगताप यांनी यावेळी केलं.


आरक्षणाचा या निवडणूकीशी संबंध लावू नका - सोळंके

-----

या निवडणूकीत पंकजाताई सारख्या कणखर व विकासाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्या उभ्या आहेत. विकास पाहिजे असेल तर पंकजाताईं शिवाय पर्याय नाही. त्याशिवाय आपल्या भागाची प्रगती होणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय विधानसभेचा आहे. लोकसभेचा नाही. आरक्षणाचा विषयाचा संबध या निवडणूकीत लावू नका.


    याप्रसंगी केशवराव आंधळे यांनी देखील आपल्या भाषणात पंकजाताईंना विजयी करण्याचं आवाहन केलं. बंजारा महिलांनी यावेळी पामडी देऊन पंकजाताईंचा सत्कार केला. सभेस मतदारांनी मोठी गर्दी केली होती.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार