युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 बजरंग सोनवणे यांना केज तालुक्यातून आणखी एक धक्का


सोनवणेंच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


परळी वैद्यनाथ (दि. 04) - महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 


लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे. 


मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, सदस्य सुंदर लाड, बालासाहेब हारगावकर, अश्रुबाई जनार्दन लाड, मेघराज लाड, तुकाराम लाड, शरद हारगावकर, कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे, अक्षय लाड, विनायक लाड, दशरथ लाड यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या