नमामि वैद्यनाथम् : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी प्रभू वैद्यनाथाचा जयकारा !
नमामि वैद्यनाथम् : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी प्रभू वैद्यनाथाचा जयकारा !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथच्या वास्तव्याने पूनित झालेल्या भूमीमध्ये जाहीर सभा होत असताना आवर्जून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रभू वैद्यनाथाला नमन करून केली. 'परळी वैजनाथ च्या वैद्यनाथाला मी नमन करतो' या मराठी भाषेतील वाक्याने भाषण सुरु केले.त्याचबरोबरच 'परळी वैजनाथ भगवान की जय' अशा प्रकारचा जयकारा करत बीड जिल्ह्यातील या जाहीर सभेत त्यांनी बोलायला सुरुवात केली.
भाजपा महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई येथे विराट जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना 'हर हर महादेव' चा जयघोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू-वैद्यनाथाचा जयकारा करूनच आपले भाषण सुरू केले. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 'परळी वैजनाथ की जय' असे म्हणत आपल्या भाषणाचा शुभारंभ केला. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये सभा घेत असताना 'नमामि वैद्यनाथम्' चा जयकारा करत बीड जिल्ह्यातील संत, महंत यांना आवर्जून अभिवादन केले.तसेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याही स्मृती आजच्या जाहीर सभेत सर्वच नेत्यांनी जागवल्याचे बघायला मिळाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा