पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !_

 पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माजलगावांत


सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महायुतीचे आवाहन; गडकरींच्या सभेने पंकजाताईंच्या विजयी मताधिक्यात होणार वाढ !


 माजलगाव, ।दिनांक ०९।

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांची माजलगाव येथे उद्या शुक्रवारी दुपारी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

      भाजप महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची सुरुवातीपासूनच प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाई येथे सभा झाली. त्यानंतर आता  माजलगाव येथे विकासपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खास पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी येत आहेत. शुक्रवार, दि. १० मे २०२४ रोजी दुपारी १२:०० वा.  जुना मोंढा, येथे ही  सभा होणार आहे. “सबका साथ सबका विकास” सूत्र डोळ्यासमोर ठेऊन, गरीब कल्याणाचा रथ मोदी सरकारने हाती घेतला.भाजप सरकारच्या मंत्रिमंडळातील कार्यकुशल प्रमुख मंत्री व विकासपुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे.ज्यांच्या मुळे देशभरात ऐतिहासिक महामार्गांचे महत्त्वकांक्षी प्रकल्प व रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. नवनवीन विकास संकल्पना कार्यान्वित झाल्या आहेत.असे  नितीन गडकरी हे पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी बीड जिल्ह्यात येत आहेत. माजलगाव येथे होणारे या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी