सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा

 सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा



माजलगाव, दि.5 : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बीड सकल चर्मकार समाजाच्यावतीने आज माजलगावात मेळावा घेत जाहीर पाठींबा देण्यात आला. चर्मकार समाजासाठी भाजपा सरकारने अनेक योजना राबविल्या असून त्याचा फायदा समाजातील विविध घटकांना झालेला आहे. त्यामुळे समाजाने एकमुखाने निर्णय घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.


माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव विधानसभा प्रमुख मोहनराव जगताप, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत पाटील, अच्युतराव लाटे, अमरनाथ खुर्पे, कृऊबा सभापती मंगेश तोंडे, संजावनी राऊत, राहुल साळुंके, रविंद्र बोराडे, सुनिता नेटके, शारदा वाघमारे यांची उपस्थिती होती.

माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकार हे गोरगरींबांसाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगात उंचावलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा देण्यात आला असून त्यासाठी बीडमधून पंकजाताई मुंडे यांना विजयी करावे, असे आवाहन बबनराव लोणीकर यांनी केले. 

समन्वयक नानासाहेब घोडके यांनी यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने अनेक मागण्या केल्या. त्यात प्रामुख्याने संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकॉम) मागील सर्व कर्ज माफ करण्यात यावे. 2024 पर्यंतचे कर्ज प्रकरणे निकाली काढून तात्काळ वाटप करण्यात यावेत. मागासवर्गीयांची अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्वाह भत्ता प्रकरणात शहरापासून 7 कि.मी. अंतरावरील अट रद्द करावी. गाव सोडून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळावा. जिल्ह्यात संत रविदास सभागृहासाठी जास्तीत जास्त फंड देण्यात यावा. रमाई घरकूल आवास योजनेची रक्कम वाढवण्यात यावी. गटई स्टॉल मागणी अर्ज दोन वर्षापासून प्रलंबित आहेत, त्याला ताबडतोब मंजूरी देऊन वाटप करण्यात यावेत. आदी मागण्या घोडके यांनी केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, युवक जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, प्रदेश युवा उपाध्यक्ष अ‍ॅड.गणेश गवळी, अ‍ॅड दत्ता जाधव, सचिन, तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू उनवणे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष सुनील माने, उपाध्यक्ष बालासाहेब गवळी, प्रभाकर भालशंकर, मधुकर ठोसर, संजय भागवत, प्रसाद वाघमोडे, डीगांबर कांबळे, सुभाष कांबळे, सुभाष कांबळे, विक्की मराठे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार