खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पंतप्रधानांच्या आशिर्वादाचा वरदहस्त आणि डोक्यावर लाडाची टपली !

 खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांना पंतप्रधानांच्या आशिर्वादाचा वरदहस्त आणि डोक्यावर लाडाची टपली !


अंबाजोगाई, प्रतिनिधी.....

  बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई येथे विराट जाहीर सभा झाली. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन विद्यमान खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केलं. गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संसदेत काम करणाऱ्या खा.डॉ प्रीतमताई मुंडे यांना भाषण संपल्यानंतर भेटताना पंतप्रधानांनी डोक्यावर वरदहस्त ठेवत त्यांना आशीर्वाद दिला. एवढेच नाही तर जाता जाता खा. प्रीतम मुंडेंच्या डोक्यावर लाडाने टपलीही मारली.


■ Click:

 *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*


          बीड लोकसभेच्या विद्यमान खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या ऐवजी यावेळी लोकसभेसाठी  पंकजाताई मुंडे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. पंकजाताई मुंडे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय निश्चित झालेला आहे. विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांचे गेल्या दहा वर्षातील खासदार म्हणून कामही अतिशय उत्तम आहे. त्यांना यावेळी उमेदवारी दिली गेली नाही. या अनुषंगाने संपूर्ण प्रचारात खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांना विस्थापित होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका पंकजाताई मुंडे यांनी वेळोवेळी जाहीर केलेली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतेही प्रीतमताई मुंडे यांचा योग्य मानसन्मान होईल अशा प्रकारचे नेहमीच सांगतात.याअनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावरील सर्वच नेत्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रीतमताई मुंडे यांनीही चरणस्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या डोक्यावर वरदस्त ठेवत एक प्रकारे आशीर्वाद दिला. त्याचबरोबर विशेषत्वाने प्रीतमताई मुंडे यांच्याशी संवाद साधत लाडाने त्यांच्या डोक्यावर टपली मारल्याचेही दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार