पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम

परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी वेदाशिवाय दुसरा ग्रंथ नाही :-  सद्गुरु श्री. चंद्रशेखर महाराज देगलूरकर


नांदेडला श्री याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम संपन्न 

.............

नांदेड प्रतिनिधी सहा मे

मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी वेदांशिवाय दुसरा ग्रंथ नाही. भारतीय संस्कृतीचे मूळ वेदांमध्ये असून वेदाभ्यास हा महत्त्वाचा आहे. धर्म व अधर्म या क्रिया शास्त्राने सांगाव्या लागतात. समोरच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी एखादी क्रिया करणे म्हणजे धर्मकार्य आहे असे प्रतिपादन सद्गुरु ह.भ‌.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी केले.

श्री महर्षी याज्ञवल्क्य सेवा प्रतिष्ठान नांदेड, द्वारा संचलित वामननगर परिसरातील श्री याज्ञवल्क्य  वेदपाठशाळेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सद्गुरूंच्या अमृतवाणीतून प्रवचनाचे आयोजन अशोक नगर येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये करण्यात आले होते.

 पंचकुंडात्मक श्रीदत्तयाग महायज्ञ व विविध कार्यक्रम दिनांक 4 व 5 मे रोजी वे.शा.सं. मनोजगुरुजी जोशी पेठवडजकर यांच्या पुढाकाराखाली ब्रह्मवृंदांच्या वेदघोंषांमध्ये हे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले.

दिनांक 4 मे शनिवार रोजी सकाळी सहा वाजता वेद पारायणाला प्रारंभ  झाला. सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये पंचकुंडात्मक श्री दत्तयाग महायज्ञ पार पडला .11 ते 12 या वेळेमध्ये चतुर्वेद सेवा व यज्ञाची आरती करण्यात आली. सायंकाळी सात वाजता श्रीदत्त पंचपदी  झाली.

रविवार दिनांक 5 मे रोजी सकाळी सहा वाजता वेद पारायणाला प्रारंभ झाला व सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये पंचकुंडात्मक श्री दत्तयाग महायज्ञ पार पडला. सकाळी  अकरा ते साडेअकरा या वेळेमध्ये पूर्णाहूती, साडेअकरा ते बारा या वेळेमध्ये विविध सेवा, दुपारी बारा वाजता यज्ञाची महाआरती दत्तयागाला बसलेल्या यजमानांच्या हस्ते व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली ‌. सायंकाळी सहा वाजता प्रा: रमाकांत व सौ संगीता चाटी निर्मित भक्तीगीत गायनाचा 'अवघा रंग एक झाला ' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये अनेक भाव मधुर व सरस दत्त गीते व भक्ती गीते सानिका चाटी, किरण सावंत, सौ. संगीता चाटी यांनी सादर केली. 

 याच कार्यक्रमात कै.श्री गोपाळशास्त्री गोरे गुरुजी, श्रीक्षेत्र पंढरपुर व कै.श्री लक्ष्मीकांत रामाचार्य पुराणिक, श्रीक्षेत्र काशी यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. भागवताचार्य श्री अनंत महाराज बेलगांवकर यांना 

' शास्त्री पुरस्कार ' व वे.शा‌.सं. अथर्ववेदाचार्य श्री देशीकशास्त्री कस्तुरे, सावरगाव यांना '  वैदिक पुरस्कार ' सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री याज्ञवल्क्य  वेदपाठशाळेंमधून वैदिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना  वेदपाठशाळेचे आचार्य वे.मू. उपेंद्र अशोक कुलकर्णी कान्हेगांवकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा सद्गुरूंच्या हस्ते सत्कार करून देण्यात आल्या. 

सत्काराला उत्तर देताना भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर म्हणाले, ' भागवताचे रहस्य जाणणाऱ्या महापुरुषांच्या नावाने दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार अध्यात्मिक क्षेत्रातील महान अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यामुळे मी धन्य झालो आहे. संतांच्या आशीर्वादाने जीवन कृतार्थ होते असे त्यांनी नम्रतापूर्वक सांगितले.

वे.शा‌.सं. अथर्ववेदाचार्य श्री देशीकशास्त्री कस्तुरे गुरुजी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले ' श्रीक्षेत्र काशी येथील कै.श्री लक्ष्मीकांत रामाचार्य पुराणिक यांनी  आपले संपूर्ण आयुष्य जगाला वेदाचे मार्गदर्शन करण्यासाठी वेचले. या महान पुरुषाचा सहवास आपल्याला लाभला व त्यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे. हाती घेतलेले कार्य पुढे जोमाने करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. वेदशाळा चालविणे अवघड कार्य आहे. परंतु ज्या निष्ठेने वे.शा.सं. मनोजगुरुजी जोशी पेठवडजकर वेदशाळा चालवितात व वेदांची सेवा करतात. त्यांना सद्गुरूंचा व प.पू. महाराजांचा आशीर्वाद या कार्यातून मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पुढे बोलताना सद्गुरु ह भ प चंद्रशेखर महाराज देगलूरकर म्हणाले, माझ्या रक्षणाची व्यवस्था कर असे वेदविद्या ब्राह्मणाला सांगत असते. विद्या ही योग्य अधिकाऱ्याला देणे आवश्यक असते. तसेच अयोग्य असणाऱ्या अनाधिकाऱ्यापासून विद्येचे रक्षण करण्याची जबाबदारी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची आहे. सद्गुरूंकडे जाणे, त्यांना नमन करणे त्यांची सेवा करणे व प्रश्न विचारून विद्या ग्रहण केली जावी. जे गुरु विद्यादान करतात त्यांच्या अंगी नम्रतेचा भाव आयुष्यभर असतो. त्यांनी प्रत्येकाला धर्मपरायण करण्याचा संकल्प केलेला असतो. परमात्म्याचे दर्शन वेद उपनिषदामधून मनुष्याला होते. त्यामुळे वेदांभ्यास महत्त्वाचा आहे. वेदांचे वेदत्व प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही. त्याची अनुभूती घ्यावी लागते.

नांदेडच्या श्री याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्कांराची उंची ज्या दोन आध्यात्मिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या अद्वितीय कार्यातून वाढलेली आहे.

 या कार्यक्रमाचे  रसाळ सूत्रसंचालन माजी उपप्राचार्य डॉ. दीपक कासराळीकर सर यांनी तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरगुरु पांडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी