_पंकजाताईंना सर्व जाती धर्मातील लोक प्रचंड मताधिक्य देवून विजयी करणार !

 देशाचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, ज्यांनी बदललं तेच चुकीचे आरोप करत आहेत


मुख्यमंत्री साहेब तुम्ही चंदनतस्कराला शोधा आणि बीड जिल्ह्यातील लोकहो तुम्ही त्याला १३ तारखेला गाडा - ना.रामदास आठवले


पंकजाताईंना सर्व जाती धर्मातील लोक प्रचंड मताधिक्य देवून विजयी करणार !


अंबाजोगाई, ।दिनांक०७।

'बीड जिल्ह्यात विकासाची गायची असेल अंगाई तर संसदेत पाठवा आपली पंकजाताई' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. कोणीही संविधान बदलणार नाही या बुद्धिभेदाला कोणी बळी पडणार नाही. राहुल गांधीच्या भाषणावर बंदी आणावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे.काँग्रेस तुम्हाला भडकावण्याचं काम करत आहे.पण त्यांना कोणी भीक घालणार नाही. पंकजाताई प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असा मला विश्वास असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

          सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारे गोपीनाथ मुंडे होते.नामांतर चळवळीत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंचे मोठे योगदान होते. त्यामुळे प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंचा नामांतरात होता मोठा वाटा,१३ तारखेला महाविकास आघाडीचा काढा काटा, गोपीनाथ मुंडेंची आठवण ठेवत पंकजाताईंना विजयी करा.निवडणूकीची तारीख आहे तेरा आणि तुतारीचे वाजवा बारा,द्या भारत माता की जय चा नारा. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पंकजाताईंचाही पाठिंबा आहे.त्यामुळे पंकजाताई सारख्या अनुभवी, अभ्यासू व तळमळीने काम करणाऱ्या नेत्याला संसदेत पाठवा. 

        महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर घाणाघाती टिका करत रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत निशाणा साधला. मुख्यमंत्री साहेब तुम्ही चंदनतस्कराला शोधा आणि बीड जिल्ह्यातील लोकहो तुम्ही त्याला १३ तारखेला गाडा  अशा शब्दात ना.रामदास आठवले यांनी टिका केली.

••••

■ Click:

 *MB NEWS LIVE :📍अंबाजोगाई* *बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभा.* 👇👇 *ठिकाण-अंबाजोगाई*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !