श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhFXc0R_zlQPCvSH8INekWbj5TTwgcNm0JBIuWbBW0WoIRkieDKGDPzPIQvMUZPZ4gj5rnYonIA4AQKOA1npN8p4ThePVOIxkseIvvBsf-uH5A2PhJ7FaL5DgMhY-Z1pVab7GaZqDSBmZ907s54wquxxWDweQANE3jNLGnFQOfvgsO7JhXI7soUy_H7Yuw/s320/IMG-20240214-WA0058.jpg)
वैद्यनाथ साखर कारखान्याचे माजी अधिकारी व्ही. एम. कुलकर्णी यांना मातृशोक श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यालय अधीक्षक विष्णू माधवराव कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई कुलकर्णी पंढरपूरकर यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. बरं मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते. श्रीमती मालतीबाई माधवराव कुलकर्णी पंढरपूरकर या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यातच आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोपालपाळे गल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघून वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती मालतीबाई कुलकर्णी या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.