स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम

 महाराष्ट्र विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश




स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम


परळी / प्रतिनिधी


ग्रामीण भागातील उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन करत शाळेतील 4 विद्यार्थी या परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील 4 विद्यार्थी उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती करिता पात्र झाले आहेत. ही परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.


या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कु.अमृता दत्ता शिंदे, चि.सलगर वरद बाबुराव, चि.विश्वजित दत्तात्रय शिंदे व कु.नंदिनी गोकुळ देशमुख हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, सर संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार