वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन

 वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन 

रासेयेतून सामाजिक जबाबदारीचे जाणिव होते - प्रा . डॉ . संजय खडप

थोर व्यक्तींचे संस्कार आत्मसाथ करण्यासाठी एन . एस.एस. - प्रा . डॉ . मकरंद जोगदंड


परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ . रमेश राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले .

यासात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष जलसंवर्धनासाठी पाझर तळे निर्मिती पाणी अडवा पाणी जिरवा - श्रमदान, आधार काटीचा संवाद जेष्ठांशी, महिला मेळावा - बालविवाह प्रथा निर्मूलन आणि प्रतिबंध कायदा जनजागरण, स्वच्छता आभियान उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शिबिराच्या उद्धाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणुन  सामाजिक जाणिवेच प्रबोधन करणारे कवी डॉ . संजय खडप, प्रा . डॉ . मकरंद जोगदंड ,प्राचार्य अरूण पवार, सरपंच सौ शाहुताई विजय राठोड,  रा. से . यो. चे प्रा . डॉ . माधव रोडे सरंपच विजय राठोड,  प्रा . डॉ . भीमानंद गजभारे, उपसरपंच कुंडलीक जाधव,  नॅकचे प्रा . बी .व्ही. केंद्रे,  मुख्याध्यापक राम राठोड, अदि उपस्थिती होते . 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंधरा महाविद्यालय घटनांदुर साहित्यीक कवी  प्रा . डॉ . संजय खडप हे म्हणाले, " राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व आणि स्वयंसेवांची जबाबदारी या विषयावर आपल्या बहारदार कवीतेतून तरूण युवक - युवतींना ग्रामिण सांस्कृतिची माणुसकी आपलेपणा बिकिट परिस्थिती जगण्याची  जाणीव करू देत ती आत्मसाथ करण्यासाठी रासेयो शिबिरांची गरज असते हे पडऊन दिले . याप्रसंगी  प्रा . डॉ . मकरंद जोगदंड यांनी कवीतेतुन प्रबोधन करत जलव्यवस्थापन, पर्यावरण संर्वधन , लोकशाही व थोर विचारवंताचे विचार शिबिरातून ग्रामविकास साधण्यासाठी करावे असे आवाहन केले . यावेळी कार्यक्रमचा अध्यक्षीय समारोप  प्राचार्य डॉ . रमेश राठोड, तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा . माधव रोडे, सरपंच विजय राठोड, प्रस्ताविक प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, सुत्रसंचालन विश्वजीत हाके,  तर विशेष सहकार्यडॉ . श्रीहरी गुट्टे, प्रा .दिलीप गायकवाड , प्रा . प्रमोद गित्ते,तर आभार राम फड यांनी मांडले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार