युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी होणार अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
            मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत दि.13 रोजी मुंबईत धर्मगुरु प.पू.अमृताश्रम स्वामी महाराजांचा शासनातर्फे सन्मान होणार आहे.
           बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)नवगण राजुरीकर   यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 13-02-2024 रोजी मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार व  सुधीर मुनगंटीवार  (सांस्कृतिक कार्य मंत्रालय) यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अमृत आश्रम स्वामी महाराज यांचा यास समारंभात गौरव होणार आहे या पुरस्कारासाठी श्री महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या